Join us  

​ अनिल कपूरने केला होता या मराठी चित्रपटाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 1:02 PM

मराठी चित्रपटांनी आज परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटांची दखल बॉलिवूडने देखील घेतली आहे. आज खूप चांगल्या ...

मराठी चित्रपटांनी आज परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटांची दखल बॉलिवूडने देखील घेतली आहे. आज खूप चांगल्या प्रमाणात हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टारच्या हस्ते मराठी चित्रपटाचे मुहूर्त होत आहेत. पूर्वी मात्र हा योग खूप दुर्मिळ होता म्हणूनच महत्त्वाचा देखील होता. सोबतचे छायाचित्र पहा. अनिल कपूरच्या हस्ते घायाळ (१९९३) या चित्रपटाच्या मुहूर्त दृश्यात अजिंक्य देव व जॉनी लिव्हर यानी सहभाग घेतल्याचे दिसतेय. आता घायाळचे निमार्ते एन. चंद्रा यांचा हा पहिला (आणि एकमेव देखील) मराठी चित्रपट असल्याने त्याच्या मुहूतार्ला हिंदीचे ग्लॅमर हवे होतेच. उर्मिला मातोंडकर देखील हजर होती. बालकलाकार म्हणून झाकोळ, संसार अशा मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला चिमुकली उर्मिला दिसली होतीच. तसेच  तिने मासूम आणि डकैत सारख्या हिंदी चित्रपटांमधून देखील भूमिका साकारल्यात. पण घायाळच्या मुहूतार्ला ती चंद्रांच्या नरसिंहच्या यशाची तारका होती. अनिल कपूरने तर चंद्रांचा तेजाब चित्रपटात भूमिका साकारली होती आणि तो चित्रपट देखील यशस्वी ठरला. म्हणुनच की काय अनिल या मराठी चित्रपटाच्या मुहूर्ताना उपस्थित होता. घायाळचे दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांचे! त्याचा हमाल! दे धमाल पासूनच चंद्रानी त्याला करारबद्ध केले होते. घायाळमधे नामवंत कलाकारांची फौज. मधुकर तोंरडमल, अजिंक्य देव, कविता लाड (तिचा हा पहिलाच चित्रपट), नीना कुलकर्णी, अशोक सराफ, पद्मा चव्हाण, जॉनी लिव्हर, शिवाजी साटम इत्यादी. अनिल कपूरच्या हस्ते मुहूर्त झाल्याने घायाळची बराच काळ चर्चा सुरु राहिली. हमाल! दे धमाल या चित्रपटामध्ये (१९८८)  अनिल कपूरने पाहुणा कलाकार म्हणून छोटीशी भूमिका साकारल्याने त्याला मराठी चित्रपटाची कार्यशैली काही प्रमाणात माहित होतीच म्हणा. पण मराठी चित्रपटाचा हिंदी कलाकारांनी मुहूर्त करण्याची ही पहिलीच वेळ होती.