मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये (upendra limaye). आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर त्यांनी सिनेसृष्टीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं. उपेंद्र लिमये हे नाव मराठी प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही. हिंदी आणि मराठीमध्ये सिनेमांमध्ये ते झळकले आहेत. त्यामुळे उपेंद्र यांची चाहत्यांमध्ये कायम चर्चा असते. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. उपेंद्र यांनी नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली असून याची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.
उपेंद्र यांच्या आलिशान गाडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उपेंद्र लिमये हे पत्नीसह नव्या गाडीची पूजा करताना दिसून येत आहे. नवी कोरी गाडी खरेदीचा आनंद त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. उपेंद्र लिमये यांनी महिंद्रा कंपनीची गाडी खरेदी केली आहे. ही एक आलिशान गाडी आहे. Mahindra XUV700tribe या कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. या नव्या गाडीसाठी उपेंद्र लिमयेंवर त्यांच्या सर्व चाहत्यांकडून आणि मराठी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
उपेंद्र लिमयेंच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या मडगाव एक्सप्रेस सिनेमात ते दिसले होते. तर 'अॅनिमल' या सिनेमामध्ये त्यांनी फ्रेडी पाटील ही भूमिका साकारली होती. त्यांच्या १० ते १५ मिनिटांच्या सीनने चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यांच्या एन्ट्रीलाच थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता. आता ते 'अॅनिमल' सिनेमाच्या दुसऱ्या भागातही झळकणार असल्याची चर्चा आहे. उमेंद्र यांनी या आधीही अनेक हिंदी चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'अंतिम द फायनल ट्रुथ', '२००- हल्ला हो', 'बंसुरी', 'सरकार राज', 'चांदनी बार', 'पेज ३' या बॉलिवूड सिनेमांत ते झळकले आहेत.