Join us

अभिनेता अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’,मात्र पोस्टरवर दिसणाऱ्या ‘त्या’ दोघी कोण? याची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 1:55 PM

चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, ‘ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी एक हटके विषय घेउन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या दिवाळीत अंकुश बॉक्स ऑफिसवर धमाका करायला येणार असून यावेळी तो एकटा नव्हे तर चक्क “ट्रिपल सीट’ येणार आहे. संकेत प्रकाश पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपाटाची  श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले आहे.

‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या पोस्टरवर मध्यभागी बासरी हातात धरलेल्या श्रीकृष्णाच्या पोझमध्ये अंकुश चौधरी दिसत असून त्याच्या दोन्ही बाजूला दोन अभिनेत्री उभ्या असलेल्या दिसतात. सोबत या चित्रपटाला ‘वायरलेस प्रेमाची गोष्ट’ अशी टॅगलाईन असल्याने हा चित्रपट एक रोमॅंटीक  कथानक घेउन येत असल्याचे दिसत असले तरी ही गोष्ट नक्की कुणाच्या प्रेमाची आहे? पोस्टरमध्ये असलेल्या त्या दोघी नक्की कोण आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.  चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, ‘ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट  येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

अंकुशची पत्नी दिपा परब ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अंकुश आणि दिपाने १९९५ साली लग्न केलं आणि आता त्यांना प्रिन्स मुलगा आहे. दिपा आणि अंकुश यांचा २३ नोव्हेंबर रोजी साखरपुडा पार पडला. अंकुश आणि दिपा एकमेकांना कॉलेज दिवसांपासून ओळखतात. अंकुश आणि दिपा हे एमडी म्हणजे महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी. आणि त्या दोघांचं प्रेम एकच आणि ते म्हणजे ऍक्टिंग आणि थिएटर. लग्नापूर्वी अंकुश आणि दिपा एकमेकांना १० वर्ष डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. अंकुश चौधरी, केदार शिंदे आणि भरत जाधव ही तेव्हाची लोकप्रिय तिकडी. केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे.लग्नाला १३ वर्षे झाल्यानंतरही या दोघांचा संसार सुखाचा सुरू आहे. दिपा पूर्णपणे घराची जबाबदारी सांभाळत असून ती सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. 

टॅग्स :अंकुश चौधरी