Join us

लॉकडाऊनमध्येच अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीचे ‘लक डाऊन’, वाचा नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 6:49 PM

‘लक डाऊन’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त जुन्नर येथे विशेष पाहुणे आणि सिनेमाची स्टारकास्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. धमाकेदार, मजेदार कथा असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार आहे.

विविध विषयांना हात घालणाऱ्या मराठी सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दिवसेंदिवस दर्जेदार आणि आशयघन सिनेमांची निर्मिती होत आहे. वेगळ्या धाटणीचे आणि वेगळा विषय असलेले मराठी सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. सिनेमा हिट होण्यासाठी त्याच्या कथेसोबतच इतर गोष्टीही तितक्याच गरजेच्या असतात. कथेसह तांत्रिक बाबीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. शिवाय या सिनेमाच्या कलाकारांची टीमही तितकीच महत्त्वाची असते. दिग्दर्शकाच्या मनातील गोष्टी पडद्यावर साकारण्याचं काम दर्जेदार कलाकार मोठ्या खुबीने करतात. त्यामुळे सिनेमासाठी उत्तम कलाकारांची फौजही तितकीच गरजेची असते. अशाच दमदार कलाकारांची जुगलबंदी आगामी लक डाऊन’ सिनेमात पाहायला मिळणार आहे.

‘लॉकडाऊन’ हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी तो ऐकावासा वाटत नाही इतका तो शब्द नकोसा वाटू लागलाय. पण ‘लॉकडाऊन’ शब्दाशी मिळता-जुळता, उच्चारताना थोड्या फार प्रमाणात समान असा, पण जरा हटके असा ‘लक डाऊन’ हा शब्द कदाचित क्वचितच ऐकला असावा आणि हा तुमची उत्सुकता वाढवल्याशिवाय राहणार नाही असं पण वाटतंय. २०२० जर ‘लॉकडाऊन’ असेल तर २०२१ ‘लक डाऊन’ असू शकतो. हे कोडं वाटतं असलं तरी हे कोडं नसून आगामी मराठी सिनेमाच्या नावाची झलक आहे, ज्यामध्ये झळकणार आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी.

 ‘लक डाऊन’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त जुन्नर येथे विशेष पाहुणे आणि सिनेमाची स्टारकास्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. धमाकेदार, मजेदार कथा असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार असून हे देखील मुहूर्ताच्या वेळी उपस्थित होते. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. ल़ॉकडाऊनमुळे २०२० वर्ष जरी टेन्शनमध्ये गेलं असलं तरी पुढील येणारं वर्ष सर्वांसाठी आनंदी आणि मजेशीर असेल कारण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘लक डाऊन’ येतोय तुमच्या भेटीला.

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. लॉकडाऊनचा परिणाम जवळपास सगळ्याच क्षेत्रावर झाला. कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांसाठी लॉकडाऊन हा संघर्षाचा काळ ठरला जो संपूर्ण आयुष्य त्यांच्य लक्षात राहिल.

टॅग्स :प्राजक्ता माळीअंकुश चौधरी