अंशुमन विचारे बनला गायक,या सिनेमातून सुरू करणार नवी इनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 8:22 AM
कलाकार हा नेहमीच नवनवी आव्हान स्विकारण्यात तप्तर असतो. क्रिएटिव्ह असतो आणि अभिनयासोबत तो वेगवेगळ्या गोष्टी देखील करण्यात प्रयत्नशील असतो.असाच ...
कलाकार हा नेहमीच नवनवी आव्हान स्विकारण्यात तप्तर असतो. क्रिएटिव्ह असतो आणि अभिनयासोबत तो वेगवेगळ्या गोष्टी देखील करण्यात प्रयत्नशील असतो.असाच एक कलाकार म्हणजे अंशुमन विचारे. एकांकिकांमधून घडलेला अंशुमन आज नाटक आणि सिनेमा क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे.'श्वास','पोस्टर बॉईज','स्वराज्य','विठ्ठला शप्पथ' अशा अनेक मराठी सिनेमातून आपल्या समोर आलेला अंशुमन आता पार्श्वगायकाच्या भूमिकेतून आपल्या समोर येत आहे.निमित्त आहे,साज इंटरटेनमेंट प्रस्तुत, अखिल देसाई, संजय लगड निर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित मोर्चा या मराठी सिनेमाचे. अंशुमन याबद्दल सांगतो की,अखिल देसाई हे माझे चांगले मित्र आहेत.'मोर्चा' या त्यांच्या सिनेमात एक वेगळ्या धाटणीचे गाणे होते.जे आजच्या सिस्टीमवर भाष्य करते.मी यापूर्वी काही टीव्ही मालिकांसाठी गायले होते त्यामुळेच सिनेमाच्या या गाण्याला मी पूर्ण न्याय देऊ शकेल अशी खात्री त्यांना होती.भरत सिंह,विकी - किरण आणि लव - कुश यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याचे गीतकार संकेत तटकरे असून सिनेमातील इतर गाणी संदेश अहिरे,प्रसाद दाणी,अखिल देसाई यांनी लिहिली आहेत तर इतर गाणी आदर्श शिंदे,राहुल देशमाने यांनी गायली आहेत.अंशुमन पुढे सांगतो की,गाण्याचे बोल आहेत,सत्य हरवले,सांगावयाचे कुणी ? विचारांचे ठसे... गाण्याचा अनुभव तर मला आहेच,परंतु सिनेमासाठी पहिल्यांदाच गात असताना थोडे दडपण होते पण जरा वेळाने आम्ही सर्वांनी ते गाणं खूप एन्जॉय केलं त्यामुळे २३ मार्चला जेव्हा 'मोर्चा' हा सिनेमा प्रदर्शित होईल तेव्हा तुम्ही नक्की हे गाणं बघा.या सिनेमात मी पाहुणा कलाकार म्हणून देखील काम केलं आहे.सिनेमात संजय खापरे,अनिकेत केळकर,दिगंबर नाईक,कमलेश सावंत,दृश्यंत वाघ,किशोर चौगुले,उदय सबनीस,गौरी कदम,पल्लवी विचारे,आरती सोलंकी,संदीप गायकवाड,संदीप जुवटकर, संजय पाटील, आणि प्रिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.