Join us

'गुलाबी साडी'वर अनुषा दांडेकरचं रील, भूषण प्रधानची खास कमेंट; अफेअरच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 18:10 IST

अभिनेत्री, मॉडेल, होस्ट अशी अनेक भूमिका निभावणारी अनुषा दांडेकर सध्या चर्चेत आहे. मराठीतील हँडसम अभिनेता भूषण प्रधान आणि अनुषा डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

अभिनेत्री, मॉडेल, होस्ट अशी अनेक भूमिका निभावणारी अनुषा दांडेकर सध्या चर्चेत आहे. मराठीतील हँडसम अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि अनुषा (Anusha Dandekar) डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघंही लवकरच एका प्रोजेक्टमध्ये सोबत झळकणार आहेत. काल गुढीपाडव्यानिमित्त अनुषाने मराठमोळा लूक करत भूषणसोबत खास फोटो शेअर केले होते. तर आज तिने गुलाबी साडी गाण्यावर रील शेअर केलं आहे. यावरही भूषणच्या कमेंटने लक्ष वेधलंय.

अनुषा दांडेकर ही फरहान अख्तरची मेहुणी आहे. फरहान अख्तरची बायको शिबानी दांडेकरची ती सख्खी बहीण आहे. सध्या गुलाबी साडी गाणं खूपच व्हायरल होतंय. सोशल मीडियावर मुली गुलाबी साडी नेसून यावरच रील पोस्ट करत आहेत. अनुषालाही गाण्यावर रील पोस्ट करण्याचा मोह आवरला नाही. काल गुढीपाडव्यानिमित्त तिने खास मराठमोळा लूक केला होता. जांभळ्या रंगाची नववारी साडी नेसली आहे. केसांचा आंबाडा बांधून त्यावर गजरा घातला आहे. कानात झुमके, गळ्यात नेकलेस, हातात बांगड्या घालून तिचा लूक परिपूर्ण केला आहे. यासोबतच नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर लावली आहे. या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. बॅकग्राऊंडला गुलाबी साडी गाणं लावत तिने रील शेअर केलं आहे.

अनुषाच्या या रीलवर भूषण प्रधानने 'कित्ती गोड' अशी कमेंट केली आहे. तर यावर अनुषाने त्याला एक भावनिक इमोजी आणि हार्ट इमोजी रिप्लाय मध्ये दिला आहे. चाहत्यांनीही अनुषाच्या सौदर्याची स्तुती करत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

अनुषाने पुष्कर जोगसोबत 'बाप माणूस' मराठी सिनेमात काम केलं होतं. तर आता ती भूषण प्रधानसोबत 'जुनं फर्निचर' सिनेमात दिसणार आहे. याच सिनेमादरम्यान दोघांच्याही अफेअरची चर्चा सुरु झाली आहे.

टॅग्स :अनुषा दांडेकरभुषण प्रधानमराठी अभिनेतामराठी चित्रपटरिलेशनशिपसोशल मीडिया