Join us

भारतातील लोकशाहीवरील राहुल गांधींच्या विधानावर आरोह वेलणकरची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 15:23 IST

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींनी केब्रिंज विद्यापिठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. या भाषणात त्यांनी चीनचे कौतुक केले आणि भारतातील लोकशीही धोक्यात असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधीं(Rahul Gandhi)नी केब्रिंज विद्यापिठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. या भाषणात त्यांनी चीनचे कौतुक केले आणि भारतातील लोकशीही धोक्यात असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे त्यांचा एक विचार संपूर्ण देशावर थोपवू पाहात आहेत, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या या भाषणावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान आता अभिनेता आरोह वेलणकरने(Aroh Welankar)ही राहुल गांधींच्या भाषणावर नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे.

राहुल गांधी यांनी केब्रिंज विद्यापीठात केलेल्या भाषणात म्हणाले की, भारतात लोकशाही संकटात आहे. पेगासस प्रकरणात माझाही फोन रडारवर होता. मला काही अधिकाऱ्यांनी सांगितले होते की फोनवर बोलत असताना सावधगिरी बाळगा कारण तुमचाही फोन टॅप होतो आहे. भारतात एक प्रकारे दबावाचे वातावरण आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केसेस टाकल्या जात आहे. माझ्या विरोधातही काही केसेस आहेत. आम्ही आमचा बचाव करत आहोत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. भारताचे विद्यमान पंतप्रधान हे भारताचे मूळ विचार नष्ट करत आहेत. आपला एकच विचार ते भारतावर थोपवू पाहात आहेत.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर अभिनेता आरोह वेलणकरने संताप व्यक्त केला आहे. त्याने राहुल गांधींच्या भाषणासंदर्भातील एएनआयचं ट्वीट त्याच्या अकाउंटवरुन रिट्वीट केले आणि या ट्वीटमध्ये त्याने राहुल गांधींचा खोटारडा माणूस म्हणून उल्लेख केला आहे. “खोटारडा आणि निर्बुद्ध माणूस” असं म्हणत आरोहने रागाचे इमोजी पोस्ट केले आहेत. राहुल गांधींबाबत आरोहने केलेले हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. आरोह वेलणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि बऱ्याचदा तो समाजातील अनेक घडामोडींवर परखडपणे मत व्यक्त करताना दिसतो.

टॅग्स :राहुल गांधीआरोह वेलणकर