मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत आरोहने लाऊडस्पीकरवर अजान देण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काय करायचं ह्याचं? असा सवाल त्याने केला आहे.आरोहने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पठाणवाडीतील घरातून आरोहने हा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओत अजानचा आवाजही स्पष्ट ऐकू येत आहे.
पहाटेचे सहा वाजले आहेत आणि अजानचा किती मोठा आवाज येतोय, हे तुम्हीही ऐकू शकता. मी अडीच वर्षापासून इथे राहतोय आणि हे रोजचे आहे. दिवसातून पाच वेळा अजान होते. मी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मशिदीतून येणा-या अजानच्या आवाजाबद्दल लिहिले होते. दोन दिवसांपूर्वीच मी याबाबत पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. तक्रारीनंतर दोन दिवस बंद झाले होते. पण आता पुन्हा सुरु झालेय. मला तरी काय करायचे कळत नाहीये. आता तुम्हीच सांगा मी काय करू? असा सवाल आरोहने या व्हिडीओत केला आहे.या व्हिडिओत त्याने त्यात मुंबई पोलीस, महानगरपालिका, आदित्य ठाकरे, मुख्यामंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना टॅग केले आहे.