'या' सिनेमाच्या कलाकारांनी सिध्दीविनायकाला घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 05:58 AM2018-03-05T05:58:50+5:302018-03-05T11:28:50+5:30

गजाननाशी गणराया, आधी वंदू तुझ मोरया सर्व देवांचा देव, कलेचा अधिपती, त्याच्या आदेशानुसार,त्याला वंदन केल्याशिवाय सर्व कामे अपुरी वाटतात. ...

The 'Artists' of the film were taken to Siddhivinayak by the visionary | 'या' सिनेमाच्या कलाकारांनी सिध्दीविनायकाला घेतले दर्शन

'या' सिनेमाच्या कलाकारांनी सिध्दीविनायकाला घेतले दर्शन

googlenewsNext
ाननाशी गणराया, आधी वंदू तुझ मोरया सर्व देवांचा देव, कलेचा अधिपती, त्याच्या आदेशानुसार,त्याला वंदन केल्याशिवाय सर्व कामे अपुरी वाटतात. आपली कामे परीपुर्ण व्हावी यासाठी या गणरायाला या सिध्दीविनायकाला नवस बोलले जातात आणि केले जातात. काही जण दर मंगळवारी या कलेच्या अधिपतीला नवस फेडण्यासाठी जात असतात. यात अभिनेते, उद्योगपती, सर्व सामान्य लोकही असतात. अनवाणी चालत जात, आपल्या परीने नवस पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. आपली सिनेसृष्टी ही यात मागे नाही. आपला चित्रपट भरपूर चालावा. पूर्ण होवून प्रदर्शित व्हावा,यासाठीही नवस बोलतात. असाच एक नवस आर.के. यंदे फिल्मच्या बॅनरखाली निर्मिती झालेला व प्रदर्शनासाठी सज्ज असलेला लई झकास या चित्रपटाचे दिग्दर्शक बाबु भट यांनीही आपला चित्रपट प्रदर्शनाआधी सिध्दीविनायकाला १०१ किलोचा मोदक अर्पण करु असे जाहीर केले होते. यावेळी निर्माते किशोर यंदे, चित्रपटाचे प्रस्तुत कर्ते स्वामी, चित्रपटातील कलाकार, निशा परुळेकर, सुनिल तावडे, सचिन गवळी, संगीतकार संजय गौरीनंदन उदयोन्मुख कलाकार,मुकेश भट आदी बरेच कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. त्यानंतर चैत्यभुमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीवर,त्याचप्रमाणे शिवाजी पार्क येथील स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला कलाकारांनी फुले वाहून त्यांचा आशिर्वाद घेतला.लई झकास हा मल्टी स्टारर, संगीत प्रधान, अॅक्शन पट तसाच संवेदनशील चित्रपट आहे.चित्रपटाची कथा बाबू भट यांची असून पटकथा संवाद राजेश बामगुडे यांनी लिहीले आहेत. चित्रपटातील धमाल गीते बाबु भट व राजेश बामगुडे यांची असुन संगीत संजयराज गौरीनंदन यांनी दिले आहेत.ह्या
गीतांना आवाज दिला आहे गायक सचिन पिळगांवकर, सुदेश भोसले, नेहा राजपाल, साधना सरगम, शिला गौरीनंदन आणि कौशिक देशपांडे यांनी आवाज दिला आहे. छायांकन दिलशाद ए.बी.संकलन फैजल इमरान, नृत्ये किरण गिरी यांची आहे.'लई झकास' या चित्रपटात संजय नार्वेकर, निशा परुळेकर, मनोज जोशी, निशिगंधा वाड, उदय सबनीस, नागेश भोसले, सुनिल तावडे, संजय कुलकर्णी, आदी बऱ्याच कलाकारांचा यात समावेश आहे.त्याचप्रमाणे मुकेश भट व मनिषा ही नवीन प्रणयी जोडी यात पदार्पण करीत आहे.लवकरच हा संगीतमय, अॅक्शनबाज लई झकास महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Web Title: The 'Artists' of the film were taken to Siddhivinayak by the visionary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.