संजय जाधवच्या ये रे ये रे पैसा या चित्रपटात झळकणार हे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 13:13 IST
संजय जाधवच्या ये रे ये रे पैसा या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात कोण कोण कलाकार असणार याची उत्सुकता ...
संजय जाधवच्या ये रे ये रे पैसा या चित्रपटात झळकणार हे कलाकार
संजय जाधवच्या ये रे ये रे पैसा या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात कोण कोण कलाकार असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या चित्रपटाच्या टीझर पोस्टरचे लाँच गेल्या महिन्यात करण्यात आले. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून संजय जाधव यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपट देखील चांगलाच असणार याची खात्री त्यांच्या फॅन्सना आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार याबाबत संजय जाधव यांनी मौन राखणेच पसंत केले होते. पण आता संजय जाधव यांनी त्यांच्या चित्रपटात असणाऱ्या कलाकारांची नावे मीडियाला सांगितली आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना सिद्धार्थ जाधव, उमेश कामत यांसारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे नवे पोस्टर हे एखाद्या नोटेप्रमाणे असून या नोटेवर सिद्धार्थ जाधव, उमेश कामत यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दोघांसोबतच तेजस्विनी पंडितची या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे. संजय यांचा गुरू हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. गुरू आणि ये रे ये रे पैसा या दोन चित्रपटांच्या दरम्यान तब्बल दीड वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे या काळात संजय जाधव काय करत आहेत. त्यांचा कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याची उत्सुकता लोकांना लागलेली होती. पण आता त्यांचा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.गुरू हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. आता त्यानंतर त्यांचा ये रे ये रे पैसा हा चित्रपट देखील जानेवारी महिन्यातच प्रदर्शित करण्याचे त्यांनी ठरवले आहे. हा चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.