Join us  

Ashadhi Ekadashi : विठ्ठल मंदिरात भजनात दंग झाला प्रसाद ओक, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 1:59 PM

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकही विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचला. प्रसाद मंदिरातील भजनी मंडळींबरोबर भजन करताना दिसला.

Ashadhi Ekadashi 2024 : दरवर्षी आषाढी एकादशीचा मोठा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतो. यंदाही मोठ्या उत्साहास आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात आणि राज्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकही विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचला. 

प्रसाद ओकने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं. पांढरा रंगाचा कुर्ता पायजमा आणि निळ्या रंगाचा शेला असा पारंपरिक पेहराव करत प्रसाद विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचला होता. यावेळी विठ्ठलाच्या भक्तीत वारकऱ्यांबरोबर प्रसाद दंग झाल्याचं पाहायला मिळालं. प्रसाद मंदिरातील भजनी मंडळींबरोबर भजन करताना दिसला. त्याने टाळ वाजवत या भजनी मंडळाला उत्तम साद दिली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सध्या प्रसाद त्याच्या आगामी धर्मवीर २ या सिनेमामुळे चर्चेत आहे. धर्मवीरमध्ये प्रसादने आनंद दिघे यांची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, प्रसादने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेता असण्याबरोबरच तो एक उत्तम दिग्दर्शकही आहे. 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' या चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केलं आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक आषाढी एकादशीमराठी अभिनेताटिव्ही कलाकार