Join us

Ashvini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अश्विनी भावेंचा चेहरा, त्या सध्या काय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 6:13 PM

Ashvini Bhave : ‘अशी ही बनवाबनवी’ या सिनेमानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हा सिनेमा आठवला की, या सिनेमाने धम्माल संवाद एकापाठोपाठ ओठांवर येतात आणि ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की एकच चेहरा डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे यांचा...

अशी ही बनवाबनवी’ या सिनेमानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हा सिनेमा आठवला की, या सिनेमाने धम्माल संवाद एकापाठोपाठ ओठांवर येतात आणि ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की एकच चेहरा डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave)यांचा. ९० च्या दशकात अश्विनी भावेंच्या सौंदर्यानं सर्वांनाच वेड लावलं होतं. मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमातही त्यांनी वेगळा ठसा उमटवला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कधीकाळी अभिनयापेक्षा जास्त रस त्यांना खेळात होता. अगदी देशासाठी ऑलंम्पिकमध्ये गोळाफेक करुन सुवर्णपदक मिळवावं अशीही स्वप्न त्या कधीकाळी पाहात होत्या. पण मधुकर तोरडमल यांच्या एका नाटकामुळं त्यांच्या आयुष्याला पुर्णपणे कलाटणी मिळाली. 

सध्या अश्विनी भावे आता मनोरंजन विश्वात फार सक्रीय नाहीत. दूर अमेरिकेत त्या आपल्या पती व दोन मुलांसोबत रमल्या आहेत. अर्थात दरवर्षी न चुकता त्या भारतात येतात. आपल्या मुलांना भारत कळला पाहिजे, हा त्यांचा उद्देश आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न करून त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. अमेरिकेत त्यांनी तिथे फिल्ममेकिंगच्या चार वर्षांच्या कोर्सला प्रवेश घेतला. सध्या त्या विविध वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखनसुद्धा करतात. या स्तंभलेखनातून भारत- अमेरिका या दोन्ही देशातले अनुभव मांडतात.

अश्विनी भावे यांचा जन्म 7 मे 1972 रोजी मुंबईत झाला.  मुंबई मधील रुपारेल कॉलेज मधून त्यांनी  फिलॉसॉफीची पदवी मिळवली आणि त्यानंतर  अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथून फिल्म संबंधित विषयात पदविका मिळवली. कॉलेजदरम्यानच त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्या छोट्या पडद्याकडे वळाल्या.

‘अंतरिक्ष’ नावाच्या विज्ञान विषयक मालिकेमधून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.  ‘शाबास सुनबाई’ या चित्रपटामधून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली होती. पण ‘अशीही बनवाबनवी’ या चित्रपटाने त्यांना वेगळी ओळख दिली. अगदी या चित्रपटानंतर त्यांना हिंदीतून ऑफर येऊ लागल्यात.  ‘हिना’ हा गाजलेला सिनेमा आणि या चित्रपटातील ‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’ हे गाणं आठवलं की आजही अश्विनी भावे यांचा चेहरा डोळ्यांपुढे येतो.

टॅग्स :अश्विनी भावेमराठी अभिनेताअशी ही बनवाबनवी