Join us

प्रथमेश परब आणि त्याच्या पत्नीकडे अशोक सराफ पाहतच राहिले, निवेदिता सराफ म्हणाल्या- "बालविवाह झालाय का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:04 IST

'अशी ही जमावजमवी' सिनेमाच्या ग्रँड प्रिमियरला प्रथमेश त्याची पत्नी क्षितीजा घोसाळकरसह उपस्थित होता. 

प्रथमेश परब हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'टाइमपास' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या प्रथमेशने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनेक कार्यक्रमांनाही तो हजेरी लावताना दिसतो. नुकतंच 'अशी ही जमावजमवी' सिनेमाच्या ग्रँड प्रिमियरला प्रथमेश त्याची पत्नी क्षितीजा घोसाळकरसह उपस्थित होता. 

प्रथमेश आणि त्याची पत्नी क्षितीजाने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची भेट घेतली. यावेळी निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी प्रथमेश आणि त्याच्या पत्नीची फिरकी घेतली. याचा व्हिडिओ क्षितीजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. प्रथमेश त्याच्या पत्नीसह अशोक सराफ यांना भेटायला येतो तेव्हा निवेदिता सराफ गमतीत म्हणतात "बालविवाह दिसतोय की नाही बालविवाह...". त्यावर अशोक सराफ म्हणतात, "म्हणून विचारलं कुठल्या शाळेत आहात".  पुढे निवेदिता सराफ "२१ आणि १८ वर्षाशिवाय लग्न करता येत नाही", असं म्हणत त्यांची फिरकी घेतात. 

दरम्यान, 'अशी ही जमवाजमवी' हा सिनेमा येत्या १० एप्रिलला प्रदर्शित होत आहे.  या सिनेमात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर  सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. ‘राजकमल एंटरटेनमेंट’ने या सिनेमाची निर्मिती केली आहे.  

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफप्रथमेश परब