Join us

अशोक मामांच्या मुलाचा पॅरिसमध्ये पासपोर्टच गेला होता चोरीला, 'या' बड्या नेत्याने केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 3:30 PM

परदेशात गेल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला पासपोर्ट.

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि पत्नी निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांच्या लेकाबाबतीत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सध्या चर्चेत आहे. परदेशात गेल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला पासपोर्ट.अशोक सराफ यांचा मुलगा पॅरिसमध्ये असताना त्याचा पासपोर्ट चक्क चोरीला गेल्याची घटना घडली. तेव्हाचा प्रसंग अशोक मामांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे.

'मी बहुरुपी' या आत्मटरित्रात अशोक मामांनी लिहिले, 'अनिकेत त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पॅरिसमध्ये राहत होता. बाहेरच्या देशात जाणाऱ्यांनी आपला पासपोर्ट जपून ठेवणं जास्त महत्वाचं असतं. मात्र अनिकेतला एक धक्कादायक अनुभव आला. चोरीच्या उद्देशाने काही लोकांनी अनिकेतला घेरलं.सुदैवाने त्याला शारिरीक इजा झाली नाही. मात्र त्याला या घटनेमुळे धक्काच बसला कारण त्याची बॅग चोरीला गेली. बॅगमध्ये पासपोर्ट असल्याने अनिकेतला टेन्शन आलं. नवीन पासपोर्ट आणि स्टुडंट व्हिसासाठी त्याला भारतात येणं आवश्यक होतं आणि हे काम ७ दिवसात होणं गरजेचं होतं.'

अशोक मामांनी मुलाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या राजकीय नेत्याची मदत घेतली. ते नाव म्हणजे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं असंही ते म्हणाले. अशोक मामांच्या आठवणीतला हा धक्कादायक किस्सा त्यांनी आत्मचरित्रात नमूद केला आहे.

टॅग्स :अशोक सराफपरिवारपासपोर्टनिवेदिता सराफ