मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तसेच टीव्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांना त्याच तडफतेने न्याय देणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ. हिंदीत एक विनोदी अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली असली तरी मराठीत त्यांनी वैविध्यपूर्ण अदाकारी साकारल्या आहेत. विनोदी भूमिकेसोबतच त्यांनी साकारलेल्या धीर गंभीर आणि खलनायकी भूमिकांनाही रसिकांनी प्रचंड दाद दिली आहे.
मात्र मराठीत विनोदी भूमिका साकारताना त्यांचे लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन आणि महेश कोठारे या प्रत्येक अभिनेत्याबरोबर वेगळेच ट्युनिंग जुळले. असे सा-यांचे लाकडे अशोक सराफ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. खास करुन त्यांचे किस्सेही खूप चर्चेत असतात. त्यांचा असाच एक किस्सा समोर आला आहे.
कलाकारांचं आयुष्य दिसतं तितकं सोपं कधीच नसतं. सतत शूटिंग आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणांवर त्यांना जमेल तसा प्रवास करायचा असतो. अशोक सराफ दोनदा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले होते. १९९८ मध्ये पहिला अपघात झाला होता. या अपघातात त्यांना जबर दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांच्या मानेला मोठा झटका बसला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. इतकेच काय तर डॉक्टरांनी त्यांना सहा महिने विश्रांती घेण्यास सांगितले होते. यातून बरे झाल्यानंतर त्याांनी 'मामला पोरीचा' या सिनेमातून पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीस आले होते.
तर दुसरा अपघात 2012 मध्ये झाला होता. यावेळीदेखील या अपघातातून ते थो़डक्यात बचावले होते. मुंबई-पुणे एक्प्रेसवरील तळेगावचा बोगदा क्रॉस करत असताना त्यांच्या गाडीचा पाठीमागील टायर फुटला होता. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. एका मोठ्या अपघातातून त्यांची सुटका झाली. त्या गाडीमध्ये अशोक सराफ यांच्यासह अभिनेता संतोष जुवेकर, दिग्दर्शक असित रेडीज व संगीतकार सतीश चंद्र त्यांच्याबरोबर प्रवास करत होते.
अशोक सराफ यांना फारसे प्रकाशझोतात राहायला आवडत नाही. फारसे सिनेमात आता ते झळकत नसले तरी कुटुंबास वेळ घालवताना दिसतात. अधून मधून कोर्यक्रमसोहळे असतील तर तिथेही आवर्जुन त्यांची उपस्थिती असते. आजही अशोक सराफ यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ मालिकांमधून रसिकांचे आजही मनोरंजन करत आहेत.