अभिनेते अशोक सराफ (ashok saraf) हे मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते. अशोक यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली असली तरी आजही ते सिनेमा, नाटक आणि मालिकाविश्वात सक्रीय आहेत. अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांची आवडती जोडी. अशोक यांचं निवेदिता यांच्यावर किती प्रेम आहे याचा अनुभव नुकताच सर्वांना आला. निवेदिता (nivedita saraf) यांना यायला उशीर झाल्याने अशोकमामा त्यांची वाट बघत होते. सर्वांनी त्यांना फोटोशूट करण्याची विनंती केली. मग पुढे काय घडलं? जाणून घ्या
निवेदिता यांना यायला उशीर झाला अन्...
'अशी ही जमवा जमवी' सिनेमात मुख्य भूमिकेत अशोक सराफ आहेत. सिनेमाचा ट्रेलर लाँच अलीकडेच मुंबईत पार पडला. या ट्रेलर लाँचला अशोकमामा वेळेत पोहोचले होते. परंतु त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता यांना यायला उशीर झाला. त्याचवेळी उपस्थित मीडियाने अशोकमामांना रेड कार्पेटवर येण्याची विनंती केली. निवेदिता आली की तिच्यासोबतच येईन,असं अशोकमामा नम्रपणे सर्वांना म्हणाले आणि निवेदिता यांची वाट बघत बसले.
इतक्यात निवेदिता यांची ट्रेलर लाँचला एन्ट्री झाली. निवेदिता येताच अशोकमामा त्यांना म्हणाले, "मी तुझ्यासाठी थांबलो होतो. हे सर्व बोलवत होते पण मी तुझ्यासाठी थांबलो." पुढे मग अशोक सराफ यांनी निवेदिता यांच्यासोबत खास फोटोशूट केलं. अशाप्रकारे पत्नी येईपर्यंत तिची शांतपणे वाट बघणारे आणि ती आल्यावरच तिच्यासोबत फोटोशूट करणाऱ्या अशोकमामांच्या स्वभावाचं वेगळं दर्शन सर्वांना घडलं. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अशी ही जमवा जमवी' सिनेमा १० एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अशोक सराफ यांच्या या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो, याची सर्वांना उत्सुकता आहे.