रहस्यमय आणि भयपट अशा विषयावर आधारित असलेल्या 'होरा' या चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. होराचे संगीत अनावरण आशीष कांटे यांच्या हस्ते करण्यात आले. 'होरा' निर्माता राहुल रविंद्र म्हात्रे, त्यांच्याबरोबर राजेश ठाकूर, रवि मनी, दीपक उघाडे, हेरिटेज मनोरंजन सहकार्याने दिग्दर्शक सिद्धांत घरत व मनोज एरुनकर, कार्यकारी निर्माता ललित गणेश अम्बर आणि प्रदीप पाडके आहेत.
यावेळी अभिनेते अशोक शिंदे म्हणाले, होरा हा स्पॅनिश शद्ब आहे. 'होरा' म्हणजे 'वेळ'. एक वाट सरू रात्रीच्या वेळी रस्ता चुकतो आणि एका बंगल्यात मुक्कासाठी जातो आणि तेथे सुरू होतो. रहस्यमय आणि विचित्र सावल्यांचा खेळ आणि तो वाट सरू त्या ठिकाणी अडकून पडतो आणि तो अडकतो होराच्या चक्रव्यूहात अशी चित्रपटाची रहस्यमय व थरारक कथा आहे. हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होईल. अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते यांनी दिली आहे.
हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होईल. अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते यांनी दिली आहे. अशोक शिंदे दुहेरी मालिकेत दिसले होते. यात त्यांनी बलवंत बल्लाळ या व्यक्तिरेखा साकारली होती. तसेचे ते माझे पती सौभाग्यवती या मालिकेतदेखील दिसले होते. अशोक रणरागिणी, माझे घर तुझा संसार, काल रात्री बारा वाजता यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला आहे.