दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा सिनेमा गेल्या 22 एप्रिलला प्रदर्शित झाला. शिवरायांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.परंतु सध्या या मराठी चित्रपटालाच महाराष्ट्रात प्राईम टाईमसाठी झगडावं लागतंय. यामुद्द्यावर अभिनेता अक्षय वाघमारेने पोस्ट लिहिली होती, मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे, यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. अक्षय वाघमारे नंतर आता आस्ताद काळेने ही याविरोधत आवज उठवला आहे. सोशल मीडियावर त्यानेही पोस्ट लिहिली आहे,
आस्तादने ही पोस्ट लिहिताना सोबत काही मिळलेल्या स्क्रिनिंग टाइमचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अस्तादने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, अजून किती वर्षं "महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमधे मराठी चित्रपटांनाच योग्य स्थान मिळत नाही" या गोष्टीचा त्रास सहन करायचाय??? किती वर्षं?????
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4962975293824378&id=100003358684659&sfnsn=wiwspwa
आस्तादची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तुम्ही मराठी चित्रपट त्या ताकतीचे बनवा का लोक बघायला येणार नाहीत असे काही यूजर्सचं म्हणणे आहे तर काहींच्या मते ऐवढे उत्कृष्ट दर्जाचे मराठी सिनेमे बनत आहेत.पण थिएटरमध्ये त्यांना योग्य स्थान मिळत नाही.