Join us

"माझा एक खूप चांगला मित्र गेला", अतुल परचुरेंच्या निधनानंतर निवेदिता सराफ भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 9:08 AM

अतुल परचुरेंच्या निधनानंतर निवेदिता सराफ झाल्या भावुक, दु:ख व्यक्त करत म्हणाल्या...

Atul Parchure On Nivedita Saraf : मराठी कलाविश्वातील दमदार, हरहुन्नरी आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन (१४ ऑक्टोबर) झालं आहे.   गेल्या २ ते ३ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांची जवळची मैत्रिण ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर अतुल परचुरेंचा फोटो पोस्ट केला आहे.

निवेदिता सराफ यांना अतुल परचुरेंच्या निधनाने धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अतुल यांचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहलं, "माझा एक खूप चांगला मित्रं गेला आमच्या दोघांच्या करिअरची सुरवात एकत्रं झाली होती टिळक आणि आगरकर ह्या नाटकातून. अतुल सारख्या एका उत्कृष्ट आणि हरहुन्नरी कलाकाराला माझा सलाम". 

अतुल परचुरे ( Atul Parchure ) यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली अशा अनेक मराठी नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय छोट्या पडद्यावरच्या 'जागो मोहन प्यारे', 'भागो मोहन प्यारे', 'अळी मिळी गुपचिळी', 'होणार सून मी ह्या घरची', 'माझा होशील ना' या त्यांच्या मालिका प्रचंड गाजल्या. तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी मोठा पडदा गाजवला. अनेक सिनेमांमध्ये ते सह अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत.

टॅग्स :निवेदिता सराफअतुल परचुरेमराठी अभिनेतामराठी चित्रपट