Join us

“कॅन्सर झाल्याचं कळताच नानांनी मला आयपीएल बघायला नेलं अन्...”, अतुल परचुरेंनी सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 7:04 PM

अतुल परचुरेंना कर्करोगाने ग्रासलं होतं. या कठीण काळात जवळच्या माणसांकडून आलेले अनुभव त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

अतुल परचुरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअर सुरुवात केली. त्यांनी नाटक, मालिकांबरोबरच अनेक चित्रपटांतही विविधांगी भूमिका साकारल्या. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अतुल परचुरेंना कर्करोगाने ग्रासलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत परचुरेंनी कर्करोगाला यशस्वीपणे कसा लढा दिला, याबाबत भाष्य केलं. तसंच या कठीण काळात जवळच्या माणसांकडून आलेले अनुभवही त्यांनी सांगितले.

चित्रपट समीक्षक सौमित्र पोटे यांच्या पोडकास्टमध्ये परचुरेंनी हजेरी लावली. ते म्हणाले, “माझी पत्नी सोनियाला नाना पाटेकरांचा फोन आला होता. १९७९ साली मी सातवीत असताना शहजादा नावाचं नाटक त्यांच्याबरोबर केलं होतं. त्यानंतर त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला नाही. पण सोनियाने त्यांच्याबरोबर दोन-तीन चित्रपटांत काम केलं आहे. त्यामुळे आमची त्यांच्याबरोबर चांगली ओळख होती. कॅर्करोगाबद्दल समजताच त्यांचा फोन आला होता. काही लागलं तर सांगा, असं ते सोनियाला म्हणाले. आता सगळं ठीक आहे, काही लागलं तर सांगू, असं सोनियाने त्यांना सांगितलं.”

"राज ठाकरे यारों का यार", अतुल परचुरेंचं वक्तव्य, म्हणाले, "त्याने एकदा फोन करुन..."

“पण त्यांना माझ्यासाठी काहीतरी करायचं होतं. मला क्रिकेट आवडतं, हे त्यांना माहीत होतं. आयपीएलच्या दरम्यान त्यांनी मला फोन केला आणि आपण सुनिल गावस्कर बॉक्समध्ये जाऊन मॅच बघायची, असं मला म्हणाले. त्यांनी माझ्यासाठी गाडी पाठवली होती. आम्ही वानखेडे स्टेडियममध्ये सुनिल गावस्कर बॉक्समध्ये जाऊन मॅच बघितली. सुनिल गावस्करांची भेट घालून दिली आणि त्यांनी मला घरी आणून सोडलं,” हे सांगताना अतुल परचुरे भावुक झाले होते.

"मी त्यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी गेले तेव्हा..."; रवींद्र महाजनींबद्दल 'त्या' महिलेचा महत्त्वाचा

अतुल परचुरे यांना ऑक्टोबर २०२२मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर उपचार घेत ते यातून बाहेर पडले. यावेळी कुटुंबीयांबरोबर मित्रमंडळींचीही मोठी साथ लाभल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :अतुल परचुरेनाना पाटेकरमराठी अभिनेतामराठी चित्रपट