आरतीने जिंकली प्रेक्षकांची मने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 5:14 AM
काही सिनेमे हे यशापयशाच्या पलीकडचे असतात. आपल्याला खूप काही शिकवून जातात. आजवर अनेक चित्रपटांनी आपल्यासाठी दिशादर्शकतेचे काम केले आहे. ...
काही सिनेमे हे यशापयशाच्या पलीकडचे असतात. आपल्याला खूप काही शिकवून जातात. आजवर अनेक चित्रपटांनी आपल्यासाठी दिशादर्शकतेचे काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आरती द अननोन लव्हस्टोरी या वास्तववादी मराठी चित्रपटातूनही मानवतावादी दृष्टिकोनाचा अनमोल संदेश देण्यात आला आहे.आरती चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या चित्रपटाविषयी कुणाल मांढरे सांगतात, ‘आरती हा चित्रपट माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे’. तर केतन लदवा सांगतात, ‘मानवतेचा चांगला संदेश समाजापर्यंत पोहचवून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे’. सगळ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा चित्रपट अशा प्रतिक्रियाही अनेकांनी या चित्रपटाविषयी व्यक्त केल्या आहेत. ही कथा वरकरणी एका कुटुंबाची असली तरी या माध्यमातून एका चांगल्या आदर्श समाजाच्या रचनेसाठी प्रयत्न करण्यात आला आहे.आरती चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केले आहे. रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करत आयुष्याची लढाई कशी जिंकता येते याचा प्रेरणादायी प्रवास आरती चित्रपटात दाखवण्यात आला आहे.या चित्रपटातील पार्वतीच्या नंदना मोरया गजानना असे बोल असलेल्या गीताला गायक आदर्श शिंदे यांनी गायलंय. आरती - द अननोन लव्हस्टोरी या चित्रपटातील इतर गाणेही श्रवणीय झाली आहेत. सुजित यादव आणि तेजस बने यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतांना प्रशांत सातोसे आणि सजित-तेजस यांनी संगीत दिले आहे. पावसाळी मनी माझ्या पेटला काहूर का या गीताला गायक आदर्श शिंदे यांचा तर मन बावरे गीताला हरिहरन आणि दिपाली साठे यांचा स्वरसाज लाभला आहे. नन्ही सी परी हे अंगाईगीत आणि विठ्ठला हे भक्तीमय गीत प्रशांत सातोसे यांनी गायले आहे. सुजित यादव यांनी आम्ही जातो हे गीत गायले आहे. ही सगळीच गाणे सध्या चांगलीच प्रसिद्ध होत आहेत. Also Read : सनी पवार आणि सारिका मेणे सांगतायेत 'आरती - अननोन लव्हस्टोरी'