Join us

"लोकशाहीचे प्रथम कर्तव्य बजावताना...", मतदानानंतर अवधुत गुप्तेनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:27 IST

अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी मतदारसंघांबाहेर रांगा लावल्या आहेत.  मत दिल्यानंतर शाहीचे बोट दाखवत सेल्फीही पोस्ट करत आहे. लोकप्रिय गायक, संगीतकार, सिनेमा निर्माता, दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने मतदानाचा हक्क बजावला आहे. 

अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. बालपणी ज्या बालवाडीच्या शाळेत शिकलो, तीच शाळा मतदान केंद्र म्हणून मिळाल्याचं त्याने पोस्ट शेअर करत सांगितले. अवधूतने कॅप्शनमध्ये लिहलं, "यंदाच्या मतदानाची मजा काही वेगळीच होती! ज्या शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि अबकड शिकलो ती शाळा म्हणजेच आमचा श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाचा 'शिशुवर्ग'. अर्थात माझी पहिली वहिली बालवाडीची शाळा! तीच यंदा मतदान केंद्र म्हणून मिळाली. आज त्याच वास्तूत लोकशाहीचे प्रथम कर्तव्य बजावताना. त्या काळी 'हुकूमशहा' वाटणाऱ्या नवाथे बाई, नाईक बाई, ताराबाई .. ह्यांच्या आठवणींनी डोळ्याच्या कडा पाणावल्या".

अवधूत गुप्तेच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. अवधूत गुप्तेसह  सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित, हेमंत ढोमे, सायली संजीव, प्रिया बापट, उमेश कामत, मनवा नाईकसह अनेक कलाकरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मराठी तसंच बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलं. तसंच इतरांना मतदान करण्याचा आवाहनही केलं.  

टॅग्स :अवधुत गुप्ते सेलिब्रिटीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४