Join us

​अविनाश आणि विश्वजीतने दिले कंडिशन्स अप्लाय- अटी लागू या चित्रपटाला संगीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 10:11 AM

संगीत हा नेहमीच भारतीय चित्रपटांचा आत्मा राहिला आहे. सुमधूर संगीताने असंख्य चित्रपटांना यश मिळवून दिल्याचे आपण नेहमी बघतो. मराठी ...

संगीत हा नेहमीच भारतीय चित्रपटांचा आत्मा राहिला आहे. सुमधूर संगीताने असंख्य चित्रपटांना यश मिळवून दिल्याचे आपण नेहमी बघतो. मराठी सिनेसंगीतातला अलीकडचा कालखंड ‘संगीतमय’ झाल्याचे आपल्याला ही लक्षात आले असेल. या चित्रपटांना ‘सुरेल’ करणाऱ्या गुणी संगीतकारांपैकी एक म्हणजे अविनाश आणि विश्वजीत ही जोडी. अनेक चित्रपटांना नावीन्यपूर्ण संगीत देणारी ही जोडी आता संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शनच्या कंडिशन्स अप्लाय- अटी लागू या चित्रपटासाठी संगीताची हटके मेजवानी घेऊन आली आहे. डॉ. संदेश म्हात्रे निर्मित व गिरीश मोहिते दिग्दर्शित हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कंडिशन्स अप्लाय या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलताना अविनाश विश्वजीत सांगतात की, आजच्या तरूणाईचा, नव्या पिढीचा हा चित्रपट असल्याने आजच्या पिढीला आवडेल असेच संगीत आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपरिक संगीताचा बाज आणि नावीन्यपूर्ण प्रयोग असे रसायन आम्ही कंडिशन्स अप्लाय या चित्रपटासाठी वापरले आहे. या चित्रपटाचे संगीत रसिकांच्या कानात रुंजी घालेल असा विश्वास या संगीतकार जोडीने व्यक्त केला आहे. एखाद्या चित्रपटाचे संगीत देताना प्रामुख्याने कसला विचार करता यावर बोलताना विषयानुरूप संगीत देण्याचा आम्ही प्रयत्न करतो असे ते सांगतात.गाणी हिट होतात ती शब्दामुळे आणि संगीतामुळे. अविनाश-विश्वजीत हे उत्तम अरेंजर असल्याने एखादे गाणे सहजपणे सजवण्याची किमया या दोघांकडे आहे. विश्वजीत यांना शब्दांची चांगली जाण असल्याने चालीवर उत्तम गीतरचना निर्माण करण्यात त्यांचा हातखंड आहे. कंडिशन्स अप्लाय मधील ‘काही कळेना’ हे मनस्पर्शी गीत विश्वजीत यांनीच लिहिले आहे. 'एकमेकांच्या सामर्थ्यांची आम्हाला पूर्णपणे कल्पना असल्याने गाण्यासाठी नेमके काय अपेक्षित आहे हे आम्हाला अगदी सहज उमगते, या उमगण्यातूनच आमच्या संगीतात त्याचं चांगले प्रतिबिंब उमटते' असे या संगीतकार जोडीचे मत आहे.