अश्विनी एकबोटेच्या स्मरणार्थ देण्यात आला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 10:50 AM
अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे. तसेच महागुरु, ...
अश्विनी एकबोटे यांनी दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे. तसेच महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, हायकमांड या मराठी सिनेमात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्या ‘गणपती बाप्पा माोरया’ या मालिकेत रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या. ही मालिका त्यांची शेवटची मालिका ठरली. अश्विनी या चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्त्म नर्तिकादेखील होत्या. त्यांनी नृत्याचे शिक्षण घेतले होते. त्या खूप चांगल्या भरतनाट्यम करत असत. नाट्यत्रिविधा या नाटकात त्यांच्या नृत्याचा आविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळत असे. या नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच पुण्यातील भरत नाट्यमंदिरात त्यांचे निधन झाले. नृत्य करत असताना गिरकी घेताना त्या रंगमंचावर कोसळल्या. त्यांना रंगमंचावरच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 22 मार्चला अश्विनी एकबोटे यांचा वाढदिवस असतो. त्यांच्या निधनानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठात भरतनाट्यमध्ये पहिल्या आलेल्या नेहा मुजुमदार या मुलीला अश्विनी नृत्य पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कारसोहळा अगदी साधेपणाने पार पडला. शरद पोंक्षे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. एका अत्यंत घरगुती कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना सुचेताताई चाफेकर यांच्या हस्ते नेहाला हा पुरस्कार देण्यात आला. सुचेताताई या अश्विनी यांच्या गुरू होत्या. त्यावेळी नेहाला अश्विनी यांचा फोटो असलेले मानचिन्ह आणि सोबत तिच्या पहिल्या रंगमंचीय अविष्कारासाठी रोख रक्कमही देण्यात आली.