Join us  

सुयश टिळक करतोय ट्रॅफिकविषयी जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2017 12:25 PM

कलाकारांसाठी मुंबई पुणे प्रवास हा रोजचा असतो असे म्हणण्यास हरकत नाही. त्याचबरोबर कित्येक लोक मुंबई पुणे प्रवास करत असतात. ...

कलाकारांसाठी मुंबई पुणे प्रवास हा रोजचा असतो असे म्हणण्यास हरकत नाही. त्याचबरोबर कित्येक लोक मुंबई पुणे प्रवास करत असतात. अशा या प्रवासाविषयी प्रत्येकाला टोलनाकाला सामोरो जावे लागते. त्याचबरोबर टोलनाका भरण्यासाठी लागणाºया रांगा यामुळे अक्षरश: वैताग येत असतो. त्यात त्या टोलनाक्यासाठी पैसे भरायचे आणि ते पंधरी ते वीस मिनीटे गर्दीत घालवायची. मात्र या सर्वावर सरकारने उपाय म्हणून एक नियम ही सुचविला आहे. मात्र हा नियम अदयाप ही लोकांपर्यत पोहोचलेला नाही. नेमकी हाच नियम प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सुयश टिळक सोशलमीडियावर पोहोचविण्याचा प्ऱयत्न करत आहे. त्याने नुकतेच आशुतोष जांबेकर यांचा पिवळी पट्टी आणि टोलला कट्टी... लेख सोशलमीडियावर शेअर केला आहे. हा लेख प्रत्येक व्यक्तीपर्यत पोहोचवून ट्रॅफिकविषयी जनजागृती सुयश करत आहे. हा लेख पुढीलप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचे नुकसान हे केवळ ने केवळ त्याच्या अज्ञानामुळे होत असते. मी गेली 4 वर्षे मी चार चाकी चालवतोय. एक मुंबईकर असल्याने गर्दी, तासनतास वाहानांच्या रांगेत उभे राहणे हे सवयीचे होऊन गेलंय. कितीही त्रास झाला तरी एक ब्र ही न काढता मुकाट्याने आपला रस्ता नापायचा हेच काय ते आपले नशीब. पण एका ठिकाणीमात्र ह्या सगळ्याचा बांध फुटतो आणि तो म्हणजे टोल नाका.                  मुंबईला सगळीकडूनच टोलचा गळफास आहे. व्यक्तिश: माझी टोल भरायला काहीच हरकत नसते परंतु टोलचे पैसे मोजायचे आणि तिथेच १५ ते २० मिनिटे गर्दीत घालवायची ह्याला माझा विरोध आहे. जर उशिरच होणार असेल तर का द्यावा हा टोल? गेल्या आठवड्यात शर्वरी पत्कीशी बोलताना हाच विषय झाला तर कळले की मुंबई सीमेवरील टोलनाक्यांवर साधारणत: १०० मीटर आधी एक पिवळी पट्टी आखली आहे. जर ट्रॅफिकमुळे आपल्याला त्याच्या आधी थांबावे लागले तर टोल भरायची गरज नाही. हा नियम कधीपासून होता सरकारच जाणो पण त्याची अंबलबजावणी जुलैपासून सुरु झालीये. पण माज्या अज्ञानामुळे ही बातमी मला गेल्या आठवड्यात कळली. म्हणजे गेले ६ महिने मी नुसताच टोल भरत होतो.                    असो, तर परवा दहिसर टोलनाक्यावर मी जवळजवळ ३० मिनिटे अडकून होतो. टोल घेणारा माणूस जेव्हा माज्याकडे आला मी त्याला फक्त "पिवळी पट्टी" एवढेच बोललो तर त्याने क्षणाचाही विलंब न लावता मला वाट मोकळी करून दिली. मलातर खूपच समाधान वाटले परंतु माज्या बरोबरीने येणाºया प्रत्येक गाडीकडून ही वसुली व्यवस्थित चालू असल्याचे पाहून मी थोडा दुखीदेखील झालो. असे कित्येक नियम, सवलती असतील ज्या अपणापर्यंत योग्य मार्गाने पोहोचत नसतील अथवा त्या पोहोचू दिल्या जात नसतील. इथे नुसते डोळे नाही तर मनदेखील उघडे ठेवावे लागेल. असो, तर पुन्हा कधी तुम्ही पिवळ्या पट्टीच्या मागे अडकलात तर विश्वासाने गाडी गियरमध्ये टाका आणि भुर्रर्रकन निघून जा. कोणताच माईकालाल तुम्हाला अडवणार नाही.आणि हो.. ही पोस्ट जास्तीत जास्त शेयर करा म्हणजे माज्यासारख्या काही अडाणी लोकांची सोय होईल...