Join us

'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसते अशी, तिचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 7:00 AM

१९९१ साली सचिन पिळगावकर दिग्दर्शित आयत्या घरात घरोबा हा चित्रपट रिलीज झाला होता.

१९९१ साली सचिन पिळगावकर दिग्दर्शित आयत्या घरात घरोबा हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अशोक सराफ यांनी साकारलेली गोपुकाकाची भूमिका खूप गाजली होती. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत सुप्रिया, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, राजेश्वरी सचदेव, सुधीर जोशी, जयराम कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

आयत्या घरात घरोबा या चित्रपटातून सचिनची बहीण आणि लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका अर्थात काननची भूमिका साकारली होती अभिनेत्री राजेश्वरी सचदेवने. राजेश्वरी सचदेव ही थिएटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना म्हणूनही ओळखली जाते.

मुंबईत एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या राजश्रीने इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) जॉईन केले होते इथे अनेक नाटकांतून तिने विविध भूमिका साकारल्या होत्या. आयत्या घरात घरोबा हा तिचा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी ‘सुरज का सांतवा घोडा’ चित्रपटात तिला काम दिले. सरदारी बेगम, हरी भरी, द फरगॉटन हिरो, वेलकम तू सज्जनपूर अशा बॉलिवूड चित्रपटातून ती झळकली.

राजश्री सचदेवने गायलेले हुल्ले हुल्लारे… हे गायलेले गाणे खूप लोकप्रिय झाले होते. राजश्रीला खरी ओळख मिळाली ती झी टीव्ही वरील अंताक्षरीच्या शोमुळे. या शोचे सूत्रसंचालन राजेश्वरी आणि अनु कपूर यांनी केले होते. याच शोमुळे तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार देखील मिळाला होता. अभिनेता वरूण वडोला याने अंतक्षरीच्या शोमध्ये पार्टीसिपेट केले होते तिथेच राजेश्वरीशी त्याची चांगली ओळख झाली. त्याच वर्षी दोघांनी एंगेजमेंट देखील केली. 

वरुण वडोला हा हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आहे. ये है मुंबई मेरी जान , कोशीश एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा अनेक दर्जेदार मालिकेतून कधी विनोदी भूमिका तर कधी चरित्र भूमिका त्याने साकारल्या आहेत.

नोव्हेंबर २००४ साली राजेश्वरी वरूण सोबत लग्नबेडीत अडकली. त्यांना देवाज्ञ नावाचा एकुलता एक मुलगा आहे. २०१८ साली राजेश्वरीने पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत कमबॅक केले. एक सांगायचंय या चित्रपटात ती पहायला मिळाली.

टॅग्स :सचिन पिळगांवकरअशोक सराफलक्ष्मीकांत बेर्डेसुप्रिया पिळगांवकर