Join us

'कर्करोगामधून बाबा बरे व्हावेत म्हणून धडपडत होती पण…'; सायली संजीनने सांगितला होता इमोशनल प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 7:29 PM

Sayali Sanjeev : आज सायली संजीवचा वाढदिवस आहे. परंतु, या वाढदिवसानिमित्त ती तिच्या बाबांना खूप मिस करते आहे.

अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. आज सायली संजीवचा वाढदिवस आहे. परंतु, या वाढदिवसानिमित्त ती तिच्या बाबांना खूप मिस करते आहे. ३० नोव्हेंबर २०२१मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले. सायलीचे तिच्या वडिलांसी अगदी घट्ट नातं होतं. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान सायलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सायली संजीवने तिच्या बाबांबद्दल भरभरून बोलत होती. सुलेखा यांनी तिला तुझ्या बाबांची एखादी आठवण सांग असं म्हटलं. यावर सायलीने त्यांच्या निधनापूर्वीची एक आठवण सांगितली. सायलीने सांगितले की, बाबांसोबतच्या असंख्य आठवणी आहेत. पण बाबांचं निधन होण्यापूर्वीची एक आठवण सांगते. एखाद्याची इच्छाशक्ती किती प्रबळ असू शकते हे मला यावरून कळले. बाबांचा कर्करोग बरा व्हावा म्हणून मी त्यांच्यावर उपचार करत होते आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच माझी इच्छा होती.

सायली पुढे म्हणाली की, बाबांवर उपचार करायचे होते म्हणून मी गाडी घेऊ शकले नाही. कर्करोगाच्या उपचारासाठी सगळे पैसे लागणार होते. मी गाडी खरेदी करू शकले नाही हे बाबांच्या डोक्यात होते. बाबांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी पाडव्याला मला गाडी गिफ्ट केली. त्यावेळी त्यांना उठून बसताही येत नव्हते. मात्र तरीही ते उठून बसले. आरटीजीएसच्या पेपरवर त्यांनी सही केली. सगळे पैसे मला देऊन त्यांनी गाडी घ्यायला लावली. काहीही करून त्यांनी ती गाडी मला गिफ्ट दिली. आजही वाढदिवसाचा केक कापत असताना बाबांना मिस करत असल्याचे तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले.

टॅग्स :सायली संजीव