Join us

४७ दिवसानंतरही बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा'ची जादू कायम, केदार शिंदे म्हणाले- खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 12:00 IST

लवकरच या सिनेमाला ५० दिवस पूर्ण होणार आहेत. मात्र तरीही बॉक्स ऑफिसवर सिनेमाने धुमाकुळ घातला आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.. ३० जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि लवकरच या सिनेमाचे सिनेमागृहात एकूण ५० दिवस पूर्ण होणार आहेत. मात्र तरीही बॉक्स ऑफिसवर सिनेमाची घौडदौड कायम आहे.

'बाईपण भारी देवा' थिएटरध्ये ५० दिवसांचं यश साजरं करेल, त्यापूर्वी सिनेमाच्या कमाईविषयी एक आनंदाची बातमी केदार यांनी सोशल मीडियावर शेअर केली. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने ७६.०५ कोटींचे कलेक्शन केले आहे. 

केदार यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'भारतमाता की जय! बाईपण भारी देवा या सिनेमाने आणखी भरारी मारली. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी स्वतंत्र झाली. सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि ती इतर सिनेमांनाही फायद्याची ठरली! एक स्त्री घर चालवते तर, सिनेमा नक्कीच चालवू शकते. याची ग्वाही या सिनेमाच्या निमित्ताने दिली गेली. लवकरच ५० वा दिवस साजरा करू. सहकुटुंब सहपरिवार आता गर्दी होते आहे. पुढची वाटचाल सोपी नाही पण अवघडही नाही. कारण तुम्ही सोबत आहात. श्री स्वामी पाठीशी आहेत. आणि श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद टप्प्या टप्यावर मिळतो आहे.' लवकरच १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

सहा बहि‍णींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने खासकरुन महिला वर्गाला भुरळ घातली आहे. या चित्रपटात काकडे सिस्टर्सच्या भूमिकेत रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुकन्या मोने, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्री आहेत.

टॅग्स :केदार शिंदेवंदना गुप्ते