केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण बारी देवा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. या सिनेमाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तिने काकडे सिस्टर्सपैकी एक असलेल्या चारूची ही व्यक्तिरेखा साकारली आहे. बाईपण भारी देवा चित्रपटातील भूमिकेसाठी दीपाचं कौतुकही होत आहे.
'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवरही सुसाट असल्याचं पाहायला मिळत आहे. एका दिवशी ६.१० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. चित्रपटाला मिळणारं यश पाहून दीपाने तिच्या सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. निखिल सानेंबरोबरचा फोटो शेअर करत दीपाने जिओ स्टुडिओचे आभार मानले आहेत. "३० जूनला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होऊन बॉक्स ऑफिसवर रंगलेला आहे. दोनआठवडे उलटून गेले असून, अजूनही प्रेक्षकांचा खूप सुंदर प्रतिसाद आणि भरघोस प्रेम अनुभवायला मिळतंय ते म्हणजे फक्त नी फक्त Jio Studios मुळे," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बाईपण खरंच भारी बाबा! सिनेमासाठी महिलांनी केला ४५ किमीचा प्रवास
पुढे दीपाने, "न्यूज पेपर, न्यूज चॅनल, सोशल मिडिया, बॅनर्स, होर्डिंग्स, इव्हेंट्स, Influencers Marketing सर्वोतोपरीने आम्हा सहाजणींच्या इतर सर्व कामांच्या वेळा संभाळून घेत आमच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम काम Jio Studios च्या निखिल सानेंच्या टीमने केलेले आहे. प्री-प्रमोशन तर उत्तम पार पडलेच परंतू चित्रपटगृहात चित्रपट रिलीज झाल्यानंतर देखील तुम्हा सर्व माय-बाप प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद आणि पाठिंब्यामुळे बॉक्स ऑफिसवर एकाच दिवसांत तब्बल ६.१० कोटींचं कलेक्शन करणारा ‘बाईपण भारी देवा’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पदरी वाहिलेल्या ह्या भरघोस यशामुळे आजही हा चित्रपट, नायिका, दिग्दर्शक, गाणी सतत न्यूजचा एक भाग ठरत आहोत. आणि या प्रत्येकक्षणी jio studiosची संपूर्ण टीम खांद्याला खांदा लाऊन खूप मेहनतीने त्यांचे काम करते आहे त्यासाठी मनापासून Thank You So Much" असंही म्हटलं आहे.
"'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर पतीचं निधन झालेल्या महिलेने...", केदार शिंदेंनी सांगितला 'तो' प्रसंग
'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने अवघ्या ११ दिवसांत बॉक्स ऑफिसवर २६ कोटींची कमाई केली आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दीपा परबसह रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत.