मनोरंजनविश्वास सध्या कोणत्या सिनेमाने धुमाकूळ घातला असेल तर तो हिंदी नाही तर मराठी चित्रपट आहे. सहा बायकांचा 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) सध्या बॉक्सऑफिसवर तुफान कमाई करतोय. सिनेमा प्रदर्शित होऊन पाच आठवडे उलटले तरी थिएटरमधली गर्दी काही कमी होत नाही. फक्त महाराष्ट्रातच नाही तर राज्याबाहेरही प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. होय नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) थेट हैदराबादमध्ये सिनेमा पाहिला आणि तोही चक्क हाऊसफुल. मृणालने सोशल मीडियावर पोस्ट करत सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूर हैदराबादमध्ये असून तिथे ती मराठी चित्रपट 'बाईपण भारी देवा' बघायला गेली होती. आश्चर्य म्हणजे तिथेही हा सिनेमा हाऊसफुल सुरु आहे. मृणालने स्टोरी पोस्ट करत लिहिले, 'किती सुंदर सिनेमा आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन. ते म्हणतात आजकाल चांगले चित्रपट कुठे बनतात? बनतात बॉस! हा पाचवा आठवडा सुरु आहे. हैदराबादमध्ये हाऊसफुल शो पाहिला. खूपच अभिमान वाटतोय.'
थिएटर मधला व्हिडिओ शेअर करत मृणाल म्हणाली, 'बाईपण भारी देवा हैदराबादमध्येही मन जिंकत आहेत. क्या बात है! हाऊसफुल' या व्हिडिओत थिएटर पूर्ण भरलेलं असून प्रेक्षक अगदी शिट्ट्या वाजवून दाद देत आहेत.
'बाईपण भारी देवा'ची क्रेझ, ८० वर्षांच्या आजीने सुकन्या मोनेंसोबत घातली फुगडी, Video व्हायरलकेदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' सिनेमा 30 जून रोजी प्रदर्शित झाला. आज २७ दिवसांनीही सिनेमा देशात हाऊसफुल सुरु आहे. आतापर्यंत सिनेमाने ७० कोटींचा गल्ला जमवला आहे. रोहिणी हट्ट्ंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये बाईपण भारी देवाची एंट्री झाली आहे.