'बाईपण भारी देवा' या सुपरहिट मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. खासकरुन महिलावर्ग हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांत गर्दी करत आहेत. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. थिएटरमध्ये चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरू असतानाचे महिलांचे डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणारा हा सिनेमा पाहण्यासाठी कोकणातल्या महिलांनी तब्बल ४५ किमीचा प्रवास केला आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपट पाहण्यासाठी दापोलीतील महिलांनी थेट खेड गाठलं. यासाठी महिलावर्गाने खास बस बूक केली होती. चित्रपट पाहण्यासाठी ४५ किमीचा प्रवास केलेल्या दापोलीतील या महिलांचे फोटो एक्सक्ल्युझिव्ह मराठी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत.
Alia Bhatt: ...अन् आलियाने उचलली पापाराझीची चप्पल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव
'बाईपण भारी देवा' सिनेमा पाहण्यासाठी दापोलीहून खेडमध्ये गेलेल्या या महिलांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तिशी-चाळीशीतल्या महिलांपासून ते अगदी आजीबाईंनीही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रवास केल्याचं फोटोत दिसत आहे. चित्रपटाला मिळणारा हा प्रतिसाद पाहून केदार शिंदेही भारावून गेले आहेत.
"'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर पतीचं निधन झालेल्या महिलेने...", केदार शिंदेंनी सांगितला 'तो' प्रसंग
'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने अवघ्या ११ दिवसांत बॉक्स ऑफिसवर २६ कोटींची कमाई केली आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत.