व्हायचे होते हीरो...झाला मेकअपमॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2016 2:32 PM
चंदेरी दुनियेत आपले नशीब आजमाविण्यासाठी असंख्य तरुण रोज या मायानगरीत येत असतात. काहींची स्वप्ने सत्यात उतरताता तर काहींना नशीब ...
चंदेरी दुनियेत आपले नशीब आजमाविण्यासाठी असंख्य तरुण रोज या मायानगरीत येत असतात. काहींची स्वप्ने सत्यात उतरताता तर काहींना नशीब साथ देत नाही. पण एका तरुणाच्या बाबतीत मात्र वेगळेच घडले आहे. हर्षद खुळे या तरुणाला व्हायचे होते हीरो पण नशीबाने त्याला बनविले चित्रपटसृष्टीतला प्रसिदध मेकअपमॅन. आता हे कसे घडले हे हर्षदने लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना सांगितले. मी हर्षद मेकअप आर्टिस्ट रूपेरी दुनियेत रमलेला माणूस !! तसा माझा आॅफीसबॉय ते मेकअप आर्टिस्ट हा प्रवास सुरू झाला तो २०१३ ला.घरातली परिस्थिती तशी मध्यम, पण आई वडिलांनी आम्हा मुलांना शक्य होईल तेवढे पुरवण्याचा प्रयत्न केला .लहानपणापासून मला सिनेमाचे खूप वेड. हीरो हीरॉईनचे चेहरे इतके स्वच्छ आणि नितळ कसे काय असतात याचा मला कुतूहल वाटे. परिस्थिती तशी मध्यम म्हणून घरखचार्साठी हातभार म्हणून मी एका कंपनी मध्ये हाउस्कीपिंग ची नोकरी चालू केली .घरामध्ये व्यवस्थित कमाई येऊ लागल्याने आई वडील खुश झाले .पण हीरो बनण्याचे स्वप्न माज्या डोक्यातून काही जात नव्हते . एक दिवस कामावरच्या एका मित्राने सांगितले की हीरो बनण्यासाठी सुरवातीला पोर्टफोलिओ करावा लागतो.माज्या मित्राने त्याच्या ओळखीच्या एका फोटोग्राफरकडे मला नेले .पण पोर्टफोलिओ चा खर्च मला झेपणारा नव्हता त्यामुळे मी फार निराश झालो पण तेव्हा तू काम करशील का असे त्या फोटोग्राफर ने मला विचारले. त्यांनी मला स्टुडिओ मध्ये मदतीला मुलगा हवा आहे असे विचारले.तेव्हा माज्या आशा पल्लवित झाल्या आणि आणि मी कामाला सुरूवात केली. स्टुडिओमध्ये पोर्टफोलिओ करण्यासाठी बरेचजण यायचे .सर त्यांचे फोटो काढण्या आगोदर त्यांच्या चेहºयाला मेकअप करायचे,मेकअप मध्ये सुंदर चेहरा आणखी सुंदर दिसायचा. .हळू हळू मला मेकअपबद्दल आवड निर्माण होऊ लागली आणि त्यामुळे मी त्याबद्दल माहिती करून घेउ लागलो. सर आधून मधून मला बाहेरच्या शूटिंग ला नेऊ लागले. बघत बघत बर्याच गोष्टी शिकत गेलो, मेकअप केल्यावर अधूनमधून मी टचउप करण्यासाठी मी मदत करू लागलो. सरांनी मला एका सिनेमाच्या सेटवर नेले त्या सिनेमाच नाव होता 'दुनियादारी' त्यावेळेस सरांकडे एक मेकप आर्टिस्ट कमी होता सरांनी मला मेकअप करतोस का असे विचारले, मला थोडी भीती वाटली पण मी हो म्हणालो. एका हीरोचा मेकअप करण्यासाठी मला सांगितले आणि माज्या हातातील ब्रश त्या हीरो च्या चेहºयावर फिरू लागला. . मेकअप पूर्ण झाला व त्या हीरो ला मी आरसा दाखवला ,वा..वा..वा खूपच छान थँक्स!! अशी त्या हीरो ने मला शाबासकी दिली . त्या हीरोच्या थँक्समुळे मला खूप आनंद झाला आणि सर पण खूप खुश झाले आणि माज्या पाठीवर शाबासकी ची थाप पडली. पुढे सरांबरोबर मी काही सिनेमांमधे मेकअप चे काम केले . एकदा मुंबईमधे मला एक मेकअप आर्टिस्ट भेटला. तू मेकअप छान करतोस ,तू माज्या बरोबर काम करशील का विचारले आणि मी हो म्हणालो. आता माझा खरा सोनेरी प्रवास सुरू झाला होता. आणखी जोमाने कामे करायला सुरूवात केली. पुढे बर्याच मेकअप आर्टिस्ट बरोबर मी पुणे आणि मुंबई मधे कामे केली.दुनियादारी, क्लासमेट, बावरे प्रेम हे, मालक , पास पास, मुंबई पुणे मुंबई २, चिट्ठी , फुन्तरु , देऊळ बंद , राक्षस , लव्ह आॅल ,नाइन एलेव्हन ,अ..., लूज कंट्रोल अशा मराठी सिनेमांमध्ये मी मेकप आर्टिस्ट म्हणून काम केली. अजुन काही सिनेमे लग्न मुबारक अजुन प्रदर्शित होणार आहेत आणि अजुन काही सिनेमांची कामे सुरू होणार आहेत त्यांची नवे गुलदस्त्यात आहेत. सध्या मी स्वत: स्वतंत्रपणे सिनेमामधे मेकप आर्टिस्टचे काम करतो आहे . माज्यातला कलाकार मला सापडला आहे तो माज्यासाठी तरी हीरो पेक्षा कमी नाही मग तो मेकप आर्टिस्ट का असेना. माज्या जीवनाचा ब्रश कुठल्या रंगाने कसा फिरवायचा आणि हे जीवन कसे सुंदर बनवायच आहे हे मला उमगले आहे .माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्यामधील कलाकार त्याला गरिबीमधून बाहेर काढतो. गरीबीची जाणीव ठेवून पुढे सरकणार्याच्या पाठीशी समर्थ कायम असतात हा माझा विश्वास आहे.