Join us

बहिणीच्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीची भावूक पोस्ट, म्हणाली, "मला तुझी खूप आठवण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 13:56 IST

बहिणीच्या आठवणीत भाग्यश्री भावूक झाली असून तिने खास पोस्ट केली आहे.

काहीच दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या (Bhagyashree Mote) बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला. बहिणीच्या अकस्मात मृत्यूने भाग्यश्रीचं कुटुंब कोलमडून गेलं आहे. भाग्यश्री तर अद्यापही सावरू शकलेली नाही. आज तिच्या बहिणीचा वाढदिवस आहे. बहिणीच्या आठवणीत भाग्यश्री भावूक झाली असून तिने खास पोस्ट केली आहे.

भाग्यश्री लिहिते,

''हा तुझ्या मागच्या वाढदिवसाचा फोटो आहे. तू माझं खरं प्रेम आहेस. तू माझी होतीस, आहेस आणि राहशील. तुझ्याबद्दल भूतकाळात बोलायचं हे मी सहनच करु शकत नाहीए. नशिबाने आपल्याला वेगळं केलं असलं तरी मनाने आपण एकत्रच आहोत. तुझ्या विचारांविना एकही दिवस जात नाही आणि आपल्या आठवणींनाविनाही. मला तुझी खूप आठवण येत आहे विशेषत: आज कारण तुझा आवडता दिवस म्हणजेच वाढदिवस आज आहे. आम्ही तुझा वाढदिवस साजरा करु कारण तूही तेच केलं असतंस बाळ. तू जिथे असशील तिथे नेहमीच पार्टी असेल. तू नेहमी आमच्यासोबत राहशील.''

भाग्यश्रीच्या या पोस्टमुळे ती अत्यंत भावूक झाल्याचे दिसून येते.बहीण मधू मार्कंडेयच्या मृत्यूला अनेक दिवस उलटले तरी अद्याप तपास लागलेला नाही. तिला दोन छोटी मुलं आहेत. सध्या भाग्यश्रीच त्यांचा सांभाळ करत आहे. तर मधू मार्कंडेयच्या पतीचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे. त्यांची दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. 

टॅग्स :भाग्यश्री मोटेपरिवारसोशल मीडिया