Join us

आधी दाजी अन् आता बहिणीचा संशयास्पद मृत्यू, भाग्यश्री मोटेवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:36 IST

मधू मार्कंडेय ही भाग्यश्री मोटेची थोरली बहीण होती.

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) हिच्या बहिणीचा  काल संशयास्पद मृत्यू झाला. मधू मार्कंडेय (Madhu Markandeya) असं तिचं नाव होतं. तिच्या बहिणीच्या आकस्मिक निधनामुळे संशय व्यक्त केला जात आहे. पिंपरी चिंचवड येथे भाड्याने फ्लॅट बघण्यासाठी गेली असता तिला चक्कर आली आणि ती कोसळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोवर तिचा मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणडे तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. त्यामुळे हा अपघात की घातपात आहे असा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

भाग्यश्रीची सोशल मीडिया पोस्ट

मधू मार्कंडेय ही भाग्यश्री मोटेची थोरली बहीण होती. तिच्या जाण्याने भाग्यश्रीला धक्का बसला आहे. भाग्यश्रीने परवाच बहिणी सोबतचे दोन फोटो शेअर केले होते. आणि त्याला कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'तुला कशी जाऊ देऊ माझ्या असण्याचा तू भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळं सांभाळून घेईल.' तर याआधीच्या एका फोटोला तिने 'तू नाहीएस?' असं कॅप्शन दिलं. 

भाग्यश्रीच्या या कॅप्शनमुळे चाहत्यांनाही कळेना की नेमकं काय झालंय. तिच्या दोन्ही पोस्टवर कमेंट करत सर्वांनी नेमकं झालंय तरी काय असे प्रश्न विचारले. यानंतर काल भाग्यश्रीने एक सविस्तर पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली. तिने लिहिले, 'माझी प्रिय बहिण हे जग सोडून गेली. तू माझ्यासाठी काय होतीस हे मी शब्दात सांगू शकत नाही. माझी आई, बहिण, मैत्रीण, साथी आणि सगळंच. मी तुझ्याविना हरवले आहे. तुझ्याशिवाय मी आता कशी जगू ? तू ते शिकवलंच नाहीस. मृत्यू सत्य आहे पण मी तुला जाऊ देणार नाही. कधीच नाही.'

तीन आठवड्यांपूर्वीच मधू मार्कंडेयच्या नवऱ्याचे संकेत मार्कंडेयचे निधन झाले होते. या दु:खातून सावरत नाही तोच तिच्या बहिणीचाही मृत्यू झाला आहे. तिला एक लहान मुलगा आणि मुलगी आहेत.

आधी दाजी आणि आता बहिणीच्या मृत्यूमुळे भाग्यश्री कोलमडून गेली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच भाग्यश्रीचा साखरपुडा झाला. यावेळी तिचे संपूर्ण कुटुंब आनंदात होते. तिची बहिण मधूही कुटुंबासोबत बहिणीच्या साखरपुड्यात आनंदात दिसली. तर भाग्यश्रीचा एकदम कडक हा मराठी सिनेमा काही महिन्यांपूर्वीच रिलीज झाला.

टॅग्स :मराठी अभिनेताभाग्यश्री मोटेमृत्यूपरिवारसोशल मीडियापोलिस