Join us

​भरत जाधव झळकणार वेलकम जिंदगीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2017 7:31 AM

भरत जाधव आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी आहे. त्याच्या नावावरच चित्रपटगृहात हाऊसफुलचा बोर्ड लागतो. भरत जाधवने आतापर्यंत फक्त लढ म्हणा, ...

भरत जाधव आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी आहे. त्याच्या नावावरच चित्रपटगृहात हाऊसफुलचा बोर्ड लागतो. भरत जाधवने आतापर्यंत फक्त लढ म्हणा, पछाडलेला, डावपेच यांसारखे अनेक हिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. श्रीमंत दामोदर पंत, सही रे सही ही भरत जाधवची नाटकं तर प्रचंड गाजली आहेत. भरतचा रंगमंचावरचा वावर हा खूपच वेगळा असतो. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना भरतला एका नव्या नाटकात पाहायला मिळणार आहे. भरत जाधव वेलकम जिंदगी या नाटकात झळकणार आहे. हे नाटक एका गुजराती नाटकावर आधारित आहे. हे नाटक गुजराती भाषेत खूपच प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. या नाटकाते लेखन सौम्य जोशी यांनी केले आहे तर या नाटकात सौम्य जोशी, जिग्ना व्यास यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता हे नाटक प्रेक्षकांना मराठीत पाहायला मिळणार असून या नाटकात भरत जाधव प्रमुख भूमिका साकारणार आहे.या नाटकात भरत जाधवसोबत डॉ. गिरिश ओक झळकणार आहे. गिरिश ओक यांनी श्री तशी सौ, यू टर्न, लव्ह बर्डस यांसारख्या नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. गिरिश ओक आणि भरत जाधव हे दोन दिग्गज या नाटकाद्वारे पहिल्यांदाच रंगमंचावर एकत्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन राजन ताम्हाणे करणार आहेत. वेलकम जिंदगी या नाटकाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी हे नाटकाच्या टीमद्वारे लवकरच या नाटकाबद्दल प्रेक्षकांना सांगण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग लवकरच मुंबईत होणार आहे.