Join us

"आता खरा सिनेमा सुरु..." 'ख्वाडा' फेम भाऊराव कऱ्हाडे लवकरच लग्नबंधनात अडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 15:52 IST

होणाऱ्या बायकोसोबत फोटो पोस्ट करत त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.

ख्वाडा फेम दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade)  यांच्या खऱ्या आयुष्यातील सिनेमाला सुरुवात होत आहे. अहो म्हणजे भाऊराव लग्नबंधनात अडकणार आहेत. होणाऱ्या बायकोसोबत फोटो पोस्ट करत त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

भाऊराव कऱ्हाडेंचा 'टीडीएम' नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाला स्क्रीन्स मिळावेत म्हणून त्यांना बराच संघर्ष करावा लागला. त्यांच्या 'ख्वाडा' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी 'बबन' हा सिनेमा केला. मोठ्या पडद्यावर सुपरहिट सिनेमे देणारे भाऊराव कऱ्हाडे यांच्या खऱ्या आयुष्यातील सिनेमालाही सुरुवात होत आहे. होणाऱ्या बायकोसोबत त्यांनी छानसा फोटो पोस्ट करत लिहिले,'आता लवकरच खरा सिनेमा सुरु..तुम्ही सगळ्यांनी आशिर्वाद द्यायला नक्की यायचंय.'

लाल साडीत त्यांची होणारी बायको खूपच सुंदर दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद स्पष्ट दिसून येतोय. नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. भाऊराव कऱ्हाडेंचा अहमदनगर जिल्ह्यात जन्म झाला. छोट्याशा गावातून येत त्यांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. 

टॅग्स :भाऊराव क-हाडेमराठी चित्रपटलग्न