Join us

Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाणवर सिनेमा काढणार, नाव असेल...; केदार शिंदेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 22:22 IST

Bigg Boss Marathi 5 winner : बिग बॉस मराठीच्या मंचावरुनच केदार शिंदेंनी सूरजवर सिनेमा बनवणार असल्याचं सांगितलं आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास होतं. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना सरप्राइजेस मिळाले. आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. 

सूरजने पहिल्या दिवसापासूनच त्याची खेळी आणि साधेपणाने सगळ्यांची मनं जिंकली. त्याला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. सूरज फायनलमध्ये गेल्यानंतर केदार शिंदेंनी एक मोठी घोषणा केली आहे. बिग बॉस मराठीच्या मंचावरुनच केदार शिंदेंनी सूरजवर सिनेमा बनवणार असल्याचं सांगितलं आहे. केदार शिंदे बिग बॉस नंतर सूरज चव्हाणवर सिनेमा काढणार असून त्याचं नावंही सांगितलं आहे. 'झापुक झुपूक' असं सूरजच्या सिनेमाचं नाव असणार आहे. 

बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलेल्या सूरजला 'बिग बॉस मराठी ५'चा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला  १४.६० लाख रुपये मिळाले आहेत. तर इलेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळाली आहे. 

अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होतं. सूरजने ट्रॉफी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर इंडियन आयडॉलनंतर रिएलिटी शोचा विजेता होण्याचं अभिजीत सावंतचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं. अभिजीत बिग बॉस मराठी ५ चा उपविजेता ठरल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. निक्की तांबोळी तिसऱ्या, धनंजय पोवार चौथ्या तर अंकिता वालावलकरवा पाचव्या स्थानावर पसंती मिळाली. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकेदार शिंदेसिनेमाटिव्ही कलाकार