Join us

मराठी अभिनेत्याच्या कारमधून महागडी बॅग चोरीला, म्हणाला, "गाडीची काच फोडून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 13:31 IST

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याच्या कारमध्ये चोरी, फोटो शेअर करत दिली माहिती

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातून अभिनेता जय दुधाणे घराघरात पोहोचला. मुलींचा क्रश आणि फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या जयचा चाहता वर्गही मोठा आहे. सोशल मीडियावरुन जय त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. सध्या जय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. जयच्या गाडीतून त्याची बॅग चोरीला गेली आहे. 

जयने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत कारमध्ये चोरी झाल्याची माहिती दिली आहे. सोमवारी (१० जुलै) जयच्या गाडीतून त्याची महागडी बॅग चोरीला गेली. कारची काच फोडून चोरांनी बॅग पळवल्याचं जयने म्हटलं आहे. जयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्या गाडीची काच फोडल्याचं स्पष्ट दिसत आहे. 

"आमच्याकडे मासिक पाळी पाळली जात नाही", हेमांगी कवीचं वक्तव्य, म्हणाली, "माझ्या आजीने..."

"मित्रांनो मी ठीक आहे. कोणीतरी माझ्या गाडीची काच फोडून बॅगची चोरी केली आहे. तुमची गाडी पार्क करताना काळजी घ्या," असं जय दुधाणेने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे. 

मनालीच्या भीषण पूरात 'बालिका वधू' फेम अभिनेता अडकला, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

जयने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. 'बिग बॉस मराठी'मुळे त्याच्या लोकप्रियतेत भर पडली. जय लवकरच महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटबिग बॉस मराठी