Join us

Bigg boss फेम मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; भाजपामध्ये घेतला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 12:02 PM

Megha dhade: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मेघाचा पक्षप्रवेश पार पडला.

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) पहिल्या पर्वाची विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे (megha dhade) हिने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मेघाचा पक्षप्रवेश पार पडला. मेघाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली. 

काय आहे मेघाची पोस्ट?

"नमस्कार वंदे मातरम ! मला आपणास सगळ्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की , तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी माझा आवडता आणि जगातला सगळ्यात मोठा बलशाली पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला आहे . हे मी माझे अहोभाग्य समजते की काल ज्यांच्या उपस्थितीत माझी प्रवेश प्रक्रिया पार पडली ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत जी पाटील , महामंत्री विजयजी चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रियाताई बेर्डे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने हा प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला. आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छान कामगिरी करून दाखवायचीआहे . समाजसेवेसाठी घेतलेल्या व्रताचे आता पुरेपूर पालन करायचे आहे. एका सुदृढ आणि सुशिक्षित सुसंस्कृत समाजाचं जे आपलं ध्येय आहे ते घेऊन आता जोमात कामाला लागायचा आहे , तेव्हा तुम्हा सगळ्यांचे ही आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्यासोबत असू द्या हीच विनंती आणि अपेक्षा आहे . धन्यवाद .जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.

दरम्यान,  मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री असलेली मेघा धाडे तिच्या बिंधास्त आणि बोल्ड लूकमुळेही कायम चर्चेत येत असते. मेघाने 'बिग बॉस मराठी'सह 'बिग बॉस हिंदी'मध्येही सहभाग घेतला होता. तसंच तिने या व्यतिरिक्त काही मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोदेखील केले आहेत. 

टॅग्स :मेघा धाडेमुंबईसेलिब्रिटीभाजपा