संजय लीला भन्साळीची निर्मिती असणा-या 'लाल इश्क' या सिनेमाची मराठी चित्रपटनगरीत सध्या मोठी हवा आहे. भन्साळी प्रॉडक्षन चा बहुमान मिळालेल्या या सिनेमाच्या कास्टिंग पासून ते युनिट मेंबरपर्यंत प्रत्येकांविषयी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या अशीच एक चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे, ती चर्चा म्हणजे, 'लाल इश्क' च्या सेटवर करण्यात आलेले बर्थडे सेलिब्रेशन!
सहनिर्माती शबिना खान यांच्या अखत्यारीत या सिनेमाचे प्रमोशन संपूर्ण महाराष्ट्रात होत असून, या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान 'लाल इश्क' कुटुंबातील अनेकांचे वाढदिवस मोठया जल्लोषात साजरी करण्यात आली. यात अभिनेता स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, शबिना खान, अमित राज या ऑनस्क्रीन मेंबर सोबतच कॅमेरामन तसेच सिनेमाच्या टेक्निशियन टिमचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या सहनिर्मात्या तसेच वेशभूषाकार शबिना खान यांनी एक कुटुंबप्रमुख या नात्याने वरील सर्वांच्या वाढदिवसाची विशेष व्यवस्था पहिली असल्याचे समजतेय. 'लाल इश्क' हा केवळ चित्रपट नसून दिग्दर्शक ,निर्माते ,कलाकार ,कॅमेरामन ,टेक्निशियन या सर्वांचे एकत्र 'कुटुंब' आहे, ज्यात केवळ पडद्यावरीलच नव्हे तर पडद्यामागील कलाकरांना देखील तेवढाच मान मिळत असल्याचे यातून सिद्ध होते. या चित्रपटातील प्रत्येकांमध्ये विशेष बॉन्डींग तयार झाले असून आमची हि फेमिली आहे. आम्ही सर्वजणांनी चित्रिकरणादरम्यान खूप मजा केली असल्याचे अभिनेता स्वप्नील जोशीने सांगितले. 'आमच्या टीममधील अनेकजणांचे बर्थडे आम्ही सेटवरच मोठ्या जल्लोषात साजरे केले असल्याचे त्याने पुढे सांगितले.
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित मराठी चित्रपटाला स्वप्ना वाघमारे -जोशी याचं दिग्दर्शन लाभल असून शिरीष लाटकर यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. प्रसाद भेंडे यांनी सिनेमाचे छायाचित्रण केले असून निलेश मोहरीर आणि अमितराज या दोघांनी सिनेमाला संगीत दिलं आहे.. लाल इश्क -गुपित आहे साक्षीला २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भन्साळी यांची मराठीतील पहिलीच निर्मिती असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे .