Join us

Sayali Sanjeev : "शाहरूखने माझा हात हातात घेतला अन् ..", सायली संजीवने सांगितलेला ‘त्या’ भेटीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 1:11 PM

राष्ट्रीय पुरस्कार विजेती सायली संजीव शाहरुखची चाहती आहे.सायलीने शाहरूख खानसोबत भेटीचा किस्साही सांगितला होता.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. काहे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सायली संजीवचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणारी सायली आज अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकली सायली संजीव आज तिचा वाढदिवस साजरा करते आहे. सायलीला गोष्ट एका पैठणीची मालिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सायली संजीव बॉलिवूडचा किंगखान शाहरुखची मोठी चाहती आहे. 

 ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus )च्या मंचावर सायलीने याबाबत खुलासा केला होता. यावेळी सायलीने शाहरूख खानसोबत भेटीचा एक किस्साही सांगितला. 

 त्याने माझा हात हातात घेतला आणि....सायलीने शाहरूख खानसोबत भेटीचा किस्सा सांगताना म्हणाली होती, ‘मी माझ्या एका मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न आणि रिसेप्शन झाल्यानंतर मी निघण्याच्या तयारीत होते. पण हॉटेलमधील सगळ्या लिफ्ट बंद करून ठेवल्या होत्या. त्यामुळे मी तिथेच अडकून पडले होते.

अचानक एक व्यक्ती माझ्या डोळ्यांसमोरून आत गेली. तो शाहरूख खान होता. मी वेड्यासारखी बघत उभे होते. माझ्या मित्राला आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटून शाहरूख बाहेर आला. माझ्या मित्राने त्याला माझी ओळख करून दिली. त्यानंतर शाहरूख माझा हात हातात घेऊन बोलत होता. मी नुसतेच त्याच्याकडे पाहत होते. तो काय बोलला, त्यातलं एक अक्षरही आठवत नाही. पण कोणीतरी ते सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले. ते सगळे फोटो मात्र माझ्याकडे आहेत...’

 

टॅग्स :सायली संजीवशाहरुख खान