मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मुक्ताचा जन्म 17 मे 1979 रोजी पिंपरी चिंचवड येथे मुक्ताचा जन्म झाला. आज मुक्ता आपला 42 वा वाढदिवस साजरा करते आहे. मुक्ताचे वडिल टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरीला होते आणि आई शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. मुक्ताच्या कुटुंबियातील कोणाचाच चित्रपटसृष्टीशी संबंध नव्हता. पण मुक्ताला मात्र अभिनेत्री व्हायचे होते.
शालेय जीवनात अनेक नाटकात काम केल्यानंतर दहावी झाले आणि पूर्णवेळ अभिनय करायचा निर्णय मुक्ताने घेतला.. तिने पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने ललित कला केंद्रात अभिनयाचे धडे गिरवले.
तिचे पहिले नाटक होते ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’. घडलं- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली.
मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील मुक्ता आणि स्वप्नील जोशीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. ‘जोगवा’ ही मुक्ताची अप्रतिम कलाकृती म्हणता येईल. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मुक्ता खºया अर्थाने लोकप्रिय झाली.