पंचम निषाद प्रस्तृत बोलावा विठ्ठल अभंगवाणी या मैफलीच्या माध्यमातून आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या मैफलीत अश्विनी भिडे देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, संगीता कट्टी आणि आनंद भाटे या दिग्गज गायकांच्या साथीला ओजस अढिया (तबला), निखील फाटक (तबला), सुखद मुंडे (पखवाज), आदित्य ओक (हार्मोनियम), सुर्यकांत सूर्वे (अतिरिक्त रिदम) आणि शड्ज गोडखिंडी (बासरी) या वादकांचा सहभाग असणार आहे. ही मैफल 10 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता षण्मुखानंद चंद्रसेकारेंद्र सरस्वती ऑडिटोरियम येथे रंगणार आहे.
भारतातील परफॉर्मिंग आर्ट्सची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी, तिचा प्रसार-प्रचार करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पंचम निषाद या संस्थेतर्फे गेली १६ वर्षे ‘बोलावा विठ्ठल’ही अभंगवाणीची मैफल खास आषाढी एकादशीचे औचित्य साजरे करण्यासाठी आयोजित केली जाते. भारतातील भक्तीसंगिताचा हा अद्वितीय इव्हेंट समजला जात असून गेल्या काही वर्षात अनेक शहरांमध्ये सादर होणाऱ्या या मैफलीला अनन्यसाधारण यश आणि देशभरातील संगीतप्रेमींचे भरभरून प्रेम मिळाले आहे.
यंदाही, पंचम निषादतर्फे भारतातील ९ शहरांमध्ये बोलावा विठ्ठल मैफली आयोजित करून आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ही संगीतवारी 1 जून रोजी बंगळुरूमधून सुरू होणार असून मंगलोर येथे 24 जुलैला संपेल. या दोन कार्यक्रमांदरम्यान बोलावा विठ्ठलचे आयोजन हैद्राबाद, इंदौर, चेन्नई, पुणे, नाशिक, मुंबई आणि जयपूर या शहरांमध्ये केले जाणार आहे. यंदा या मैफलीत सहभागी होणाऱ्या प्रसिद्ध शास्त्रीय व उप-शास्त्रीय गायकांमध्ये आश्विनी भिडे-देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, वेंकटेश कुमार, देवकी पंडीत, आनंद भाटे, रंजनी-गायत्री, संगीता कट्टी आणि आर्या आंबेकर यांचा समावेश आहे.
जवळपास बाराव्या शतकापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील संत नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, बहीणाबाई आणि अन्य संतांनी रचलेल्या अभंगरचना हे कलाकार सादर करणार आहेत. बोलावा विठ्ठलची तिकीटे www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.