'समांतर'च्या पहिल्या पर्वाला अतुलनीय असे यश मिळाल्यानंतर आणि प्रेक्षकांकडून विक्रमी हिट्स प्राप्त झाल्यानंतर ‘समांतर-२’ या मराठी वेब सिरीजचा दुसरा सिझन दाखल झाला आहे.नितीश भारद्वाज आणि स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडित यांनी या मालिकेमध्ये दर्जेदार रंग भरले आहेत पण या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्ये सई ताम्हणकर आल्याने या मालिकेमध्ये वेगळीच जान आणि ग्लॅमर आणले आहे. ‘समांतर’च्या पहिल्या पर्वाला तब्बल २०० दशलक्ष प्रेक्षकसंख्या मिळाली. या पर्वाची खूप वाहवा झाली आणि पुरस्कार मिळाले.
दुसऱ्या पर्वामध्ये अधिक मोठ्या प्रमाणवर थ्रील असणार आहे कारण या पर्वामध्ये कुमारचा परिस्थितीशी झगडा तर सुरु राहणारच आहे पण त्याचबरोबर या पर्वालासई ताम्हणकरच्या ग्लॅमरचा तडका मिळाला आहे.या सीझनमध्ये स्वप्निल आणि नितीश हे एकमेकांसमोर असल्याने त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहेच. मालिकेमध्ये भारद्वाज यांनी सुदर्शन चक्रपाणीची भूमिका अशी काही रंगविली आहे की प्रेक्षक तिच्या प्रेमात पडतात. स्वप्निल जोशी या मालिकेमध्ये कुमार महाजनच्या भूमिकेमध्ये आहे. सुदर्शन चक्रपाणीने कुमारचे आयुष्य आधीच जगले आहे.
‘समांतर’ या वेबसिरीजमध्ये स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांनी या मालिकेत महत्वाच्या भूमिका पार पडल्या आहेत. त्या दोघांचीही ही पहिलीच वेब सिरीज होती. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केले आहे. सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज बेतली आहे.दुसऱ्या पर्वामध्ये नितीश भारद्वाज आणखी एका प्रमुख भूमिकेमध्ये असून त्याबद्दल रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. स्वप्निल जोशीच्या पहिल्या पार्वतील व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची आणि त्याच्या चाहत्यांचीही माने जिंकली होती.
आपल्या ‘समांतर-२’मधील भूमिकेबद्दल बोलताना स्वप्निल जोशी म्हणाला की, मराठी चित्रपटांमधील नवीन प्रकार हाताळण्यासाठी मी फार उत्सुक आहे. ही माझ्या कारकीर्दीचा उत्तम असा टप्पा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी एका नव्या टप्प्याला सुरुवात केली असून मी सध्या असे सिनेमे किंवा प्रयोग करत आहे,जे मला लोक करू नको म्हणून सांगत आहेत. माझ्या इमेजमधून बाहेर पडण्याचा हा माझा प्रयत्न आहे. मला ‘समांतर’ने जे प्रेम आणि आदर दिला आहे तो मला वाटते दहा रोमॅन्टीक चित्रपटांनीही दिला नसता.”