जगभरात कोरोना व्हायरसच्या थैमान घातले आहे. आतापर्यंत तरी भारतात याने कुणाचाही मृत्यू झाला नाही. पण दिल्लीमध्ये एक व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे दिल्लीत भीतीचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमिवर बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटींनी कलाकरांची होळी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
जयवंत वाडकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी बुधवारी देशवासियांना यावर्षी कोरोनामुळे होळी न खेळण्याचे आवाहन केले आहे. त्यालाच प्रतिसाद देत आम्ही मराठी कलाकारांची होळी रद्द करतो आहे. कारण रंगाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरु शकतो अशी भिती आहे. कोरोना हा फक्त माणसांमुळे किंवा खाण्याच्या पदार्थातून होतो नाहीय तर चीनमधून ज्यावस्तू येतायेत त्यामुळे देखील कोरोना होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर खबरदारी घेते आम्ही होळी यावर्षी खेळत नसल्याचे त्यांनी या व्हिडीओतून स्पष्ट केले आहे.
मराठी कलाकार एकत्र येऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करतात. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटीही होळीच्या रंगात रंगतात. बॉलिवूडमध्ये ही होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी होळीचा सण साजरा केला जाणार नसल्याचे आता स्पष्ट केले.
पंतप्रधान होली मिलन कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नसल्याचे ट्विटरवरुन स्पष्ट केले होता. त्यामुळे एकंदरित यावर्षी होळीच्या सणावर कोरोनाचे दाट सावट आहे.