गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत देणार रसिकांना 'बोनस',दोघांचा दिसणार नवीन अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 09:43 AM2018-03-03T09:43:22+5:302018-03-03T15:13:22+5:30
मराठी सिनेसृष्टीत विविध विषयांवील दर्जेदार सिनेमांची निर्मिती होत आहे. प्रत्येक सिनेमाचा विषय आणि कथा हटके असते. मराठी सिनेमाची कथा ...
म ाठी सिनेसृष्टीत विविध विषयांवील दर्जेदार सिनेमांची निर्मिती होत आहे. प्रत्येक सिनेमाचा विषय आणि कथा हटके असते. मराठी सिनेमाची कथा आणि विषय बॉलिवूडलाही भुरळ घालत आहे. मराठी सिनेमांची किर्ती थेट ऑस्करपर्यंत पोहचली आहे. आता मराठीत असाच एक वेगळा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. बोनस हा सगळ्यांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येकाला बोनस हा हवाहवासा वाटतो. कुणासाठी बोनस हा पैसारुपी असतो तर कुणासाठी हा बोनस म्हणजे एक आनंदाचा खजिना असतो. मात्र बोनस हा एक सिनेमाचा विषय होऊ शकतो याची कल्पना कुणीच केली नसेल. लवकरच बोनस हे शीर्षक असलेला मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या सिनेमाचा मुूहूर्त पार पडला. हिंदी चित्रपटसृष्टीचा दबंग सलमान खान याच्या उपस्थितीत या सिनेमाचा मुहूर्त पार पडला होता. लायन क्राऊन एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे. बोनस या सिनेमाची कथा माणुसकीवर आधारित आहे. आयुष्यातील महत्त्वशील पैलूवर भाष्य करतो आणि सोबतच हा सिनेमा एक मजेशीर सफरही करून देणार आहे. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या बोनस या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने पूजा आणि गश्मीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यांत दोघांचाही अंदाज अनोखा असल्याचे दिसते. एरव्ही ग्लॅमरस दिसणारी पूजा सावंत फोटोत अगदी साधी सरळ आणि सुंदर तितकीच निरागस अशी पाहायला मिळत आहे. या फोटोला चाहत्यांनीही खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देत असल्याचे पाहायला मिळत आहे. काहींनी हा आगामी बोनस सिनेमातला लूक आहे का?असेही अनेक प्रश्न विचारले आहेत. तुर्तास या फोटोत दिसणारा पूजा आणि गश्मीरचा लूक हा 'बोनस' सिनेमातला असल्याच्या चर्चा रंगत आहे. 'बोनस' या सिनेमाची कथा सौरभ भावे यांनी लिहली आहे. या सिनेमाचं संगीतसुद्धा खास असणार आहे. सिनेमाला संगीताचा साज रोहन -रोहन या तरूण संगीतकार जोडीने चढवला आहे. बोनस हा शब्द आनंद आणि उत्साहाशी निगडीत आहे. त्यामुळे हा सिनेमा अवघ्या महाराष्ट्राला उत्साह, आनंद आणि मनोरंजनाचा बोनस देईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.