सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. कलाकारांना प्रत्येक सिनेमातून काहीना काही शिकवण किंवा नवीन गोष्ट शिकायला मिळत असते. तसेच काहीसे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत झाले आहे. तिचा हिरकणी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून सोनालीच्या कामाची खूप प्रशंसा झाली. तसेच या चित्रपटातून तिला खूप शिकवण मिळाली, हे तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून समजते आहे.
सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, आधी हाताला चटके तवा इंडक्शन वर भाकर.... रायगडावरच्या एका छोट्याशा झोपडीत चुलीवर भाकरी थापायला शिकले... “हिरकणी" साठीच्या ट्रेनिंगचा एक भाग म्हणून..... आता दुबईतल्या एका टॉवरमध्ये तोच अनुभव कामी येतोय... कुठल्याही वयातलं कसलंही शिक्षण हे थोडे चटके देणारं असलं तरी सुखाची भाकर देणारंही असतंच...!!!
सोनाली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भाकरी थापायला शिकली होती. रायगडावरीलच एका छोट्याश्या झोपडीत तिने ही कला शिकली आणि आज तोच अनुभव दुबईमधल्या एका टॉवरमध्ये स्वयंपाक करतेवेळी तिच्या मदतीला आला आहे हेच ती अतिशय अभिमानाने सांगत आहे.
सोनालीच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळते आहे.