Casting Couch : हर्षाली झिनेला व्हॉट्स अॅपवर मॅसेज पाठवून म्हटले, ‘हे कपडे घालून हॉटेलमध्ये ये’!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 1:44 PM
इंडस्ट्रीमध्ये नेहमीच हे चित्र बघावयास मिळाले की, लहान शहरातील तरुणी अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईला येतात. एक ब्रेक ...
इंडस्ट्रीमध्ये नेहमीच हे चित्र बघावयास मिळाले की, लहान शहरातील तरुणी अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईला येतात. एक ब्रेक मिळावा म्हणून त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. यातील काही तरुणींना फारसे कष्ट न घेता त्यांचे स्वप्न साकारही करता येतात. मात्र काही अशाही तरुणी आहेत, ज्यांना अभिनेत्री होण्यासाठी कास्टिंग काउचला बळी पडावे लागते. आमच्यासोबत कॉम्प्रोमाइज केल्यास तुला चांगली भूमिका दिली जाईल अशी प्रकारची डिलच या अभिनेत्रींसोबत केली जाते. यातील काही अभिनेत्री त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अशाप्रकारांना बळीही पडतात. असाच काहीसा प्रकार मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री हर्षाली झिने हिच्यासोबत घडला. होय, हर्षालीची कास्टिंग काउचची कथा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत हर्षालीने म्हटले की, ‘हे माझ्यासोबत नेहमीच घडायचे. जेव्हा एखाद्या भूमिकेच्या आॅडिशनसाठी जात होती तेव्हा मला अशाप्रकारचा सामना करावा लागायचा. मात्र याचरदम्यान माझ्यासोबत एक अशी काही घटना घडली, ज्याचा मला धक्का बसला. होय, एका खूप मोठ्या व्यक्तीने मला अॅप्रोच केले. मी त्याचे नाव घेऊ इच्छित नाही. कारण ही घटना माझ्यासाठी खूपच धक्कादायक आहे. त्या व्यक्तीने माझ्या व्हॉट्स अॅपवर मॅसेज केला अन् म्हटले की, मला तुझ्यासोबत हे करायचे आहे. मला काहीच कळत नव्हते की, यावर मी काय प्रतिक्रिया द्यायला हवी. मी खूपच घाबरली होती. कारण मला माहिती होते की, हा खूप मोठा व्यक्ती असून, राजकारणाशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे मी कुठल्याही चुकीच्या शब्दाचा वापर केला असता, तर माझ्याशी काहीही घडू शकले असते. मी हे प्रकरण अतिशय चतुराईने हाताळण्याचा विचार केला. मी त्याला भेटण्यास होकार दिला. त्यानंतर त्याने मला हॉटेलमध्ये येण्यास सांगितले. त्याचबरोबर या रंगाचा ड्रेस घालून येण्याचाही आग्रह केला. मला त्यावेळी काहीच समजत नव्हते. तो मला नेहमीच रात्रीच्या एक ते दीड वाजेच्या दरम्यान फोन करायचा. फोनवर तो माझ्याशी अश्लील संवाद साधायचा. त्यामुळे मला रात्रभर झोप येत नव्हते. माझे संपूर्ण शरीर थरथर कापायचे. त्याने मला लगातार एक महिना फोन केले. त्यानंतर मी विचार केला की, मी त्याच्या फोनला उत्तर देणार नाही. मात्र मला हे माहिती नव्हते की, माझ्या या कृतीमुळे तो काहीही करू शकतो. माझे अपहरण किंवा अन्य काही कृत्य करू शकतो. त्यामुळे मी त्याला विचारले की, तुला काय हवं आहे. त्याने उत्तरात म्हटले की, मी एक नाटक प्रोड्यूस करीत आहे. ज्यामध्ये मी तुला संधी देऊ इच्छितो. मात्र मला प्रश्न पडला की, हा मला अर्ध्या रात्रीच का फोन करतो. त्यानंतर त्याने मला त्याच्या चित्रपटात भूमिका देणार असल्याचे सांगताना एक कॉम्प्रोमाइज करावी लागेल असे म्हटले. मला समजत नव्हते की, त्याला नेमके काय म्हणायचे आहे. कारण मी त्याबाबतचा विचारही करू शकत नव्हते. त्यामुळे मी त्याला म्हटले की, तुला काय म्हणायचे हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. हे मी त्याला इंग्रजी भाषेत म्हटले होते. मात्र त्याला इंग्रजी फारशी येत नसल्याने मी काय म्हटले हे त्याला समजले नाही. त्यामुळे मी त्याला हीच बाब हिंदी भाषेत सांगितली. तेव्हा तो म्हणाला की, जर तुला भूमिका हवी असेल तर तुला कॉम्प्रोमाइज करावी लागेल. मला त्याच्या बोलण्याचा अर्थ स्पष्टपणे समजला. त्यामुळे मला धक्काच बसला. खरं तर त्याने जर माझी बॉलिवूड किंवा कुठल्याही मराठी चित्रपटात शिफारस केली असती तर मला सहज संधी मिळाली असती, असेही हर्षालीने सांगितले.