Join us  

'चंद्रा'वर अंकूर वाढवेचा धमाकेदार डान्स; सोनालीही पडली त्याच्यापुढे फिकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 6:34 PM

Ankur wadhave: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकूरने अत्यंत सुंदररित्या हा डान्स केला असून त्याच्या पुढे सोनालीदेखील फिकी पडल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आणि आदिनाथ कोठारे (adinath kothare) यांचा 'चंद्रमुखी' (chandramukhi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या कथानकासह त्यातील गाणीदेखील सोशल मीडियावर तुफान गाजली. विशेषकरुन चंद्रा हे गाणं चांगलंच चर्चेत राहिलं. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर रिल्स तयार केले. यामध्येच आता प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेता अंकूर वाढवे ( ankur wadhave) यानेही या गाण्यावर ताल धरला आहे.

'चंद्रमुखी' हा चित्रपट रिलीज होऊन बरेच दिवस झाले. मात्र, चंद्रा या गाण्याची क्रेझ अद्यापही नेटकऱ्यांवरुन कमी झालेली नाही. यामध्येच अंकूर वाढवेनेदेखील चक्क नऊवारी साडी नेसून या गाण्यावर ताल धरला आहे. यावेळी स्नेहल शिदमनेदेखील त्याला साथ दिली. अंकूरने त्याच्या इन्स्टाग्रामवर या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकूरने अत्यंत सुंदररित्या हा डान्स केला असून त्याच्या पुढे सोनालीदेखील फिकी पडल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. अंकूर सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून वरचेवर पोस्ट शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. 

टॅग्स :सिनेमाप्रसाद लाडसेलिब्रिटी