चौर्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 11:08 AM
समीर आशा पाटील दिग्दर्शित चौर्य या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी निर्मित केलेला हा चित्रपट आहे.
समीर आशा पाटील दिग्दर्शित चौर्य या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी निर्मित केलेला हा चित्रपट आहे. जागृत देवस्थान असलेल्या शनी शिंगणापूर गावात चोरी होत नाही म्हणून गावातल्या घरांना दरवाजे नसतात. पण देवळातच चोरी झाल्याने लोकांच्या श्रध्देला तडा जाते. या चोरी गावात चोरी कोणी केली असावी हिच चर्चा चालू असते. माणसांचे कर्म बदललं की पैशाचा धर्म असा संशय निर्माण होतो आणि पोलिसांची फौज चोराला शोधण्यासाठी सज्ज होते. असा हा चित्रपट आहे. या चित्रपटात किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास,दिनेश लता शेट्टी, तीर्था मुरबाडकर आणि श्रुती कुलकर्णी आदींच्या भूमिका आहेत.